व्हाईस ऑफ मिडिया परभणी जिल्हा अध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल, पत्रकार कैलास चव्हाण यांचा सत्कार
परभणी जिल्हा प्रतिनिधी :- ब्रह्मांडनायक श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त पूजन करून व परभणी जिल्ह्यातील मागील पंधरा वर्षापासून पत्रकारीता क्षेत्रामध्ये उत्कृष्ट कार्य करणारे अधिस्विकृती धारक पत्रकार कैलास चव्हाण आडगावकर यांची व्हाईस ऑफ मिडिया परभणी जिल्हा कार्याध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल हार व पुष्पगुच्छ देऊन दिनांक 18 एप्रिल एप्रिल रोजी व्हॉइस ऑफ मीडिया जिल्हा शहर कार्यालय रामकृष्ण नगर वसमत रोड परभणी येथे राष्ट्रजन फाउंडेशन व वीर वारकरी सेवा संघाच्या वतीने सत्कार करण्यात आला.
यावेळी अध्यक्षस्थानी बालाजी आयुर्वेदिक केंद्राचे संचालक डॉ.गोविंद कामटे, प्रमुख पाहुणे व्हॉइस ऑफ मीडिया साप्ताहिक विंगचे जिल्हाध्यक्ष अँड विवेक मुंदडा ,संयोजक लोकसेवक नितीन जाधव गोगलगावकर (वीर वारकरी सेवा संघ महाराष्ट्र राष्ट्रीय कार्याध्यक्ष तथा राष्ट्रजन फाउंडेशनचे अध्यक्ष ) प्रसिध्दी प्रमुख सोमनाथ स्वामी, पांडुरंग दुधाटे उपस्थित होते.

0 टिप्पण्या