देवी देवस्थान तांबुळगाव येथे देवी भागवत ज्ञानयज्ञ कथा संपन्न.
पालम तालुका प्रतिनिधी :- मौजे तांबुळगाव येथे देवी देवस्थान तुळजापूर ठाणे, येथील देवी भागवत ज्ञानयज्ञ कथा तिसऱ्या वर्षांचा, देवी भागवत ज्ञानयज्ञ सोहळा संपन्न झाला,नऊ दिवस हभप श्री शेषराव मोहणाजी सोपणे मामा यांनी, देवी भागवत कथा सांगितली, देवी भागवत कथा निष्काम सेवा केल्याने हभप श्री शेषराव सोपणे मामा यांचा, कपडे,दस्ती, टोपी व पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला.
दररोज देवी जगदंबा मातेची आरती, महाप्रसादाचा भाविक भक्तांनी लाभ घेतला,रोज रात्री देवी जगदंबेच्या गीताचं जागरण,आराधी सौ.दैवशाला माणिकराव सदगे यांच्या जयभवानी आराधी मेळा भजनी मंडळाचा दनदनीत कार्यक्रम करण्यात आला.
या कार्यक्रमाला यशस्वी पणे पुर्ण करण्यासाठी, श्री माणिकराव सदगे, श्री बाबुराव खर्डे, सरपंच सौ.कल्पना खर्डे,सौ सविता शेषराव सोपणे, यांनी मोलाचे सहकार्य केले, सांगता समई तांबुळगाव,खोरस येथील भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

0 टिप्पण्या