गंगाखेड कृषी उत्पन्न बाजार समितीवर महाविकास आघाडीला बहुमत.
गंगाखेड प्रतिनिधी राजकुमार मुंढे :- गंगाखेड कृषि उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूकीत महाविकास आघाडीने विद्यमान आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे पॅनल व भारतीय जनता पक्षाच्या पॅनलचा धुव्वा उडविला स्पष्ट
गंगाखेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या 18 पैकी 11 जागां महाविकास आघाडीला मिळाल्या तर, आमदार गुट्टे यांच्या पॅनलला सात जागांवर समाधान मानावे लागले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी आमदार डॉक्टर मधुसूदन केंद्रे, माजी आमदार सिताराम घनदाट, खासदार संजय जाधव, बाळासाहेब चौधरी,भगवानराव सानप यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीने सहकारी संस्था मतदारसंघातील 11 जागा पटकावल्या. तर आमदार गुट्टे यांच्या पॅनलने ग्रामपंचायत मतदार संघातील 4, व्यापारी मतदारसंघातील 2 व हमाल मापाडी संघातील 1 अशा 7 जागा पटकावल्या आहेत.

0 टिप्पण्या