डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी जयंती विविध उपक्रमांनी उत्साहात साजरी

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी जयंती विविध उपक्रमांनी उत्साहात साजरी  
उमरगा तालुका प्रतिनिधी :- महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संपूर्ण मानव जातीसाठी कार्य केल्यामुळेच त्यांचे विचार संपूर्ण जगालाच उपयुक्त ठरले आहेत. त्यांच्या विचार व कार्याचे प्रतिबिंब राज्यघटनेत उमटले. आंबेडकरांच्या विविध  विचारांची या देशाला आवश्यकता असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव दिलीप भालेराव यांनी केले.                      भीमनगर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती उत्सव मंडळाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी जयंती शुक्रवारी (ता. १४) रोजी आयोजित कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या  अध्यक्षस्थानी भारत पेट्रोलियमचे माजी व्यवस्थापक सिध्देश्वर भालेराव होते. या वेळी जिल्हा बँकेचे अध्यक्ष बापूराव पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक मच्छींद्रनाथ शेंडगे, माजी नगराध्यक्ष व्यंकटराव जाधव गुरुजी, धनराज मंगरुळे, रशीद शेख, माजी उपनगराध्यक्ष शरणाप्पा गायकवाड, श्रीकांत बेंडकाळे, दत्ता चटगे, प्रमोद कुलकर्णी, अजित चौधरी, डॉ.नितीन डागा, बबनराव बनसोडे, अँड.उदय वैद्य आदींची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी बापूराव पाटील यांच्या हस्ते महात्मा गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुताळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन व ध्वजारोहण करण्यात आले. राम कांबळे यांनी त्रिशरण व पंचशील म्हटले. राहुल लेझीम पथकाने आपली कला सादर करुन श्रोत्यांची मने जिंकली. अध्यक्षीय समारोप प्रसंगी भालेराव म्हणाले की, बाबासाहेबांची जयंती जगभर साजरी होते. त्यांचे विचार आपण सर्वांनी जोपासले पाहिजेत. यावेळी आंबेडकर चषक २०२३, ग्रामीण डे-नाईट पासींग व्हॉलीबॉल स्पर्धेतील पहिला क्रमांक आलूर येथील वारीयरस संघाचे संघनायक अमित व्हट्टे यांना रोख २१ हजार १३२ व चषक तर द्वितीय क्रमांक मुरूमच्या सम्राट व्हॉलीबॉल संघाचे  संघनायक अभिषेक पवार यांना रोख ११ हजार १३२ व चषक बापूराव पाटील यांच्या हस्ते देवून सत्कार करण्यात आला. या प्रसंगी रविंद्र कांबळे यांच्या वतीने स्नेह भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. जयंती मंडळाचे अध्यक्ष राम सागर, उपाध्यक्ष बळीराम भालेराव, सचिव विशाल बनसोडे, कोषाध्यक्ष विशाल कांबळे, आबाराव कांबळे, अजित भांगे, प्रा. अण्णाराव कांबळे, प्रा. डॉ. नागनाथ बनसोडे, राहुल गायकवाड आदींनी पुढाकार घेतला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहशिक्षक संतोष कांबळे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. डॉ. सिध्दार्थ मुरूमकर तर आभार प्रा. महेश कांबळे यांनी मानले. या वेळी परिसरातील बहुसंख्येने नागरिक उपस्थित होते.           फोटो ओळ : मुरूम, ता. उमरगा येथील भीमनगर मधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती उत्सव मंडळाच्या वतीने आयोजित डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस अभिवादन करताना बापूराव पाटील, दिलीप भालेराव, सिद्धेश्वर भालेराव, व्यंकटराव जाधव, धनराज मंगरुळे, मच्छिंद्रनाथ शेंडगे, शरणाप्पा गायकवाड आदी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या