देवी देवस्थान तांबुळगाव येथे देवी भागवत ज्ञानयज्ञ कथेचा पाचवा दिवस
पालम तालुका प्रतिनिधी :- मौजे तांबुळगाव येथे देवी देवस्थान तुळजापूर ठाणे, येथील देवी भागवत ज्ञानयज्ञ कथेचा पाचवा दिवस, आजचे आरतीचे मानकरी व अन्नदाते श्री बालासाहेब डहाळे, प्रभू दंदे, बाबुराव खर्डे हे होते,
सकाळी आई भवानी मातेची आरती नंतर दुपारी दोन ते चार भागवत कथा हभप श्री शेषराव मोहणाजी सोपणे मामा यांच्या सुमधुर वाणीतून सांगण्यात आली, नंतर चार ते सात वाजे पर्यंत भाविक भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला, रात्री नऊ ते बारा जयभवानी आराधी मेळा भजनी मंडळाच्या जागरण गीताचा, देवी भक्त आराधी सौ.दैवशाला सदगे यांचा कार्यक्रम सादर होणार आहे.
कार्यक्रमाची व्यवस्था श्री माणिकराव सदगे,श्री बाबुराव खर्डे, सरपंच सौ कल्पना खर्डे,पेठशिवणी सर्कल प्रभाग संघ सचिव सौ सविता शेषराव सोपणे हे नऊ दिवस करणार आहेत.
या वेळी गावातील भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

0 टिप्पण्या