देवी देवस्थान तांबुळगाव येथे देवी भागवत ज्ञानयज्ञ आरंभ

देवी देवस्थान तांबुळगाव येथे देवी भागवत ज्ञानयज्ञ आरंभ

पालम तालुका प्रतिनिधी :- मौजे तांबुळगाव येथे देवी देवस्थान तुळजापूर ठाणे, येथील देवी भागवत कथा ज्ञानयज्ञ दिनांक ११/०४/२०२३ रोज मंगळवारी सुरूवात झाली असून, दुपारी बाबुदेवाच्या यथोचित पुजा करुन, भागवत कथा हभप श्री शेषराव मोहणाजी सोपणे मामा यांच्या सुमधुर वाणीतून सांगण्यात येत आहे,
प्रथम आरती माणिकराव सदगे यांची झाली.कार्यक्रमाची व्यवस्था श्री बाबुराव खर्डे, सरपंच सौ कल्पना खर्डे,पेठशिवणी सर्कल प्रभात संघ सचिव सौ सविता शेषराव सोपणे हे नऊ दिवस करणार आहेत.आईचा जागर आराधी सौ दैवशाला माणिकराव सदगे यांच्या जयभवानी आराधी मेळा करणार आहेत.

रोज कथा दुपारी दोन वाजता सुरू होणार असून, नऊ दिवस आरती व महाप्रसाद कथे नंतर आयोजित केला आहे,
पहिल्या दिवशी या कार्यक्रमाला,चतुरबाई आवळे, रुक्मिणी आवळे, कांताबाई आवळे या भाविकांची उपस्थिती होती.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या