सरस्वती विद्यालयात विज्ञान प्रज्ञाशोध परीक्षेतील गुणवंतांचा गौरव.
गंगाखेड प्रतिनिधी :- शहरातील सरस्वती विद्यालय येथे दिनांक 28 फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त सायन्स टॅलेंट सर्च अर्थात विज्ञान प्रज्ञाशोध परीक्षा घेण्यात आली. त्याचा बक्षिस वितरण समारंभ कार्यक्रम दिनांक 10 एप्रिल रोजी विद्यालयात संपन्न झाला.
विद्यालयातील 300 विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. यामध्ये 5वी ते 7वी व 8वी 9वी अशा दोन गटांमध्ये पारितोषिक वितरण झाले. यामध्ये 5वी ते 7वी गटामध्ये आदित्य करवर प्रथम, अथर्व जोशी याने द्वितीय पारितोषिक पटकावले . तसेच श्रावणी गुट्टे, हर्ष कुरूडे, विशाल तांदळे, अभय गुट्टे व संस्कार पाठक यांनी तृतीय पारितोषिक पटकावले .
तर 8वी व 9वी गटात मरियम खान, अपेक्षा शिंदे यांनी प्रथम पारितोषिक, सुप्रिया राठोड, शिवगंगा देवकते यांनी द्वितीय पारितोषिक तर जयेश जोशी व वैष्णवी शेंडगे यांनी तृतीय पारितोषिक मिळवले. प्रथम विजेत्यास नगदी रोख रुपये 700, द्वितीय 500 तृतीय 200 असे बक्षीसाचे स्वरूप होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे पर्यवेक्षक रमेश गिराम तर प्रमुख पाहुणे म्हणून उपमुख्याध्यापिका छाया घोळवे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनंत काळे तर आभार प्रदर्शन गोपाळ मंत्री यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी स्वप्निल पाटील, बालासाहेब सातपुते, राजेश लोंढे, सिमा साळवे तसेच विद्यालयातील सर्व विज्ञान शिक्षकांनी सहकार्य केले. सत्कार प्रसंगी विद्यार्थांना विज्ञान विषयातील विविध स्पर्धा परीक्षा बद्दल मार्गदर्शन करण्यात आले.

0 टिप्पण्या