समाजहित अभियान प्रतिष्ठान च्या वतीने गरजू रुग्णास रक्त उपलब्ध करून देऊन केली मदत.
परभणी जिल्हा प्रतिनिधी :- परभणी शहरातील समाजहितासाठी सामाजिक कार्य, रुग्णहितार्थ निःस्वार्थ कार्य करणारी सामाजिक संस्था समाजहित अभियान प्रतिष्ठान च्या वतीने परभणी जिल्हा सामान्य रुग्णालय येथे बाळंतपणासाठी ऍडमिट असलेल्या गरजू माता महिला रुग्णाला दिनांक 29मार्च रोजी B+ पॉझिटिव्ह रक्त गटाच्या रक्ताची आवश्यकता होती. तेंव्हा रुग्णाचे नातेवाईक दीपक सावंत रा. कोदरी ता.गंगाखेड जि.परभणी व सामाजिक कार्यकर्ते समाधान पोटभरे यांनी रुग्णास रक्त उपलब्ध करून देण्यासाठी समाजहित अभियान प्रतिष्ठान शी संपर्क साधला. तेंव्हा समाजहित अभियान प्रतिष्ठान चे संस्थापक अध्यक्ष प्रमोद अंभोरे, सचिव रमेश घनघाव, विनोद वाडेकर, राजू घोगरे यांनी तात्काळ जिल्हा सामान्य रुग्णालय परभणी येथील मेट्रो ब्लड बँक येथून B+ पॉझिटिव्ह रक्त गटाच्या रक्त पिशवी वेळेवर उपलब्ध करून देऊन रुग्णास मदत केली आहे.
गरजू रुग्णास वेळेवर रक्तदान करून रक्त उपलब्ध करून दिल्या बद्दल रुग्णाचे नातेवाईक दीपक सावंत व सामाजिक कार्यकर्ते समाधान पोटभरे यांनी समाजहित अभियान प्रतिष्ठान चे आभार मानले.
यावेळी रुग्णास वेळेवर रक्त उपलब्ध करून देण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते हरदीप सिंग बावरी, बाबा राऊत मेट्रो ब्लड बँक वैद्यकीय अधिकारी,कर्मचारी डॉ राठोड मॅडम, दीपक कंडेरे, किशोर जाधव, हमीद सिद्दीकी, अनिल सावंत, विठ्ठल शिंदे, माधव गोचडे, अतुल जाधव, आत्माराम जटाळे, मारोती क्षिरजवार यांचेही विशेष सहकार्य लाभले.

0 टिप्पण्या