परभणी जिल्हा प्रतिनिधी :- शिवसेनेची वाढती लोकप्रियता व शिवसेना परभणी जिल्हा प्रमुख व्यंकटराव शिंदे व मागासवर्गीय विभाग जिल्हाप्रमुख धम्मदीपभाऊ रोडे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शेकडो कार्यकर्ते शिवसेनेत शामील होत आहेत. त्या अनुषंगाने दिनांक 27 मार्च 2023 (सोमवार) रोजी शिवसेना संपर्क कार्यालय खंडोबा बाजार परभणी येथे जिल्हाप्रमुख वेंकटराव शिंदे, महिला राज्य सरचिटणीस अनिता ताई सरोदे, मागासवर्गीय विभाग जिल्हाप्रमुख धम्मदीपभाऊ रोडे, महिला जिल्हाप्रमुख गीताताई सूर्यवंशी, दळवी ताई,उपजिल्हा प्रमुख प्रल्हाद होगे पाटील, तालुका प्रमुख प्रभाकर कदम, तालुका प्रमुख अंबादास मदने,पोंडूळे दादा,युवा जिल्हाप्रमुख दीपक टेंगसे,शहर प्रमुख गोटू मुरकुटे,युवा नेते संदीप भाऊ आघाव,राजेश चक्कर पाटील,मागासवर्गीय विभाग चे संजय भाऊ पवळे,अमोल वाकळे,समन्वयक गणेश भाऊ सूळ,समन्वयक मोबीन भाई शेख,समन्वयक कृष्णा कानडे,तालुका संघटक अंकुश राठोड,अरून भरोसे, महिला शहर संघटक गंगासागर ताई वाळवंटे,युवा तालुका प्रमुख हरी भाऊ भरोसे, गोविंद भाऊ काकडे,युवा नेतृत्व राहुल शिंदे युवा उपशहर प्रमुख चेतन चारण, राहुल शिंदे व इतर पदाधिकारी यांच्या उपस्थितीत परभणी विधानसभा प्रमुखपदी अरविंद पाणपट्टे,पाथरी विधानसभापदी प्रमुख लक्ष्मीकांत तिडके,जिंतूर तालुका प्रमूखपदी ऍड सुनील बुधवंत, मानवत तालुका प्रमुखपदी वशिष्ठ धोपटे, महिला आघाडी तालुका प्रमुखपदी जिंतूर सौ अक्षता राजेश चक्कर पाटील, शहर प्रमूख मानवत या पदी किशोर भाऊ चव्हाण, युवा सेना शहर प्रमुख जिंतूर या पदी गजानन गीते यांची निवड करण्यात आली आहे. सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्र देऊन पुष्पहार घालुन सन्मान करण्यात आला.

0 टिप्पण्या