अखिल भारतीय पोलिस हक्क संरक्षण संघटनेच्या परभणी जिल्हा प्रशिध्दी प्रमुख पदी श्री प्रसाद पौळ यांची नियुक्ती बद्दल पोलिस अधिक्षकाकडून शुभेच्छा.
परभणी जिल्हा प्रतिनिधी :- अखिल भारतीय पोलीस हक संरक्षक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री. श्रीनिवास इंदुरकर यांच्या सूचनेनुसार, श्री शेषराव सोपणे मामा महाराष्ट्र राज्य प्रशिध्दी प्रमुख यांच्या मार्गदर्शनाखाली श्री दिलीप माने संपादक दैनिक आजचा लोकप्रश्न तथा जेष्ठ पत्रकार, यांच्या हस्ते श्री प्रसाद पौळ, संपादक रूरल एक्स्प्रेस यांना,अखिल भारतीय पोलिस हक्क संरक्षण संघटना परभणी जिल्हा प्रशिध्दी प्रमुख म्हणून दैनिक आजचा लोकप्रश्न कार्यालयात नियुक्ती पत्र देण्यात आले.
परभणी जिल्हा प्रशिध्दी प्रमुख पदी नियुक्ती झाली असता, श्री शेषराव सोपणे मामा महाराष्ट्र राज्य प्रशिध्दी प्रमुख व श्री प्रसाद पौळ परभणी जिल्हा प्रशिध्दी प्रमुख यांनी, परभणी पोलिस अधिक्षक श्रीमती रागसुधा आर यांची सदिच्छा भेट घेतली असता, श्रीमती रागसुधा आर यांनी श्री प्रसाद पौळ यांना, अखिल भारतीय पोलिस हक्क संरक्षण संघटनेच्या परभणी जिल्हा प्रशिध्दी प्रमुख पदी नियुक्ती झाल्याबद्दल अभिनंदन केले व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या,
यावेळी श्री शेषराव सोपणे मामा व श्री प्रसाद पौळ यांनी अखिल भारतीय पोलिस हक्क संरक्षण संघटनेचे उद्देश व कार्या विषयी थोडक्यात माहिती सांगितली.

0 टिप्पण्या