पांडुरंग रणखांब महाराष्ट्र पोलीस, संजय पवळे, हर्ष नगरीचे संपादक संघपाल आढागळे यांची समाजहित पानपोईला सदिच्छा भेट.
परभणी जिल्हा प्रतिनिधी :- परभणी शहरातील समाजहितासाठी सामाजिक कार्य करणारी सामाजिक संस्था समाजहित अभियान प्रतिष्ठानच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या डॉ. आंबेडकर नगर, आय.टी.आय. कॉर्नर, जिंतूर रोड, परभणी येथील थंड जारच्या समाजहित पानपोईला साप्ताहिक हर्षनगरी या वृत्तपत्राचे संपादक संघपाल अढागळे, महाराष्ट्र पोलीस पांडुरंग रणखांब, सामाजिक कार्यकर्ते संजय पवळे, प्रभाकर प्रधान यांनी दिनांक 29 मार्च रोजी सदिच्छा भेट दिली. या भेटी दरम्यान समाजहित अभियान प्रतिष्ठानच्या वतीने संघपाल आढागळे, पांडुरंग रणखांब, संजय पवळे, प्रभाकर प्रधान यांचा पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला.
या वेळी सत्काराला उत्तर देताना संघपाल आढागळे व पांडुरंग रणखांब आणि मान्यवरांनी समाजहित अभियान प्रतिष्ठानने सामाजिक उपक्रम राबविल्याने प्रतिष्ठानचे व सर्व पदाधिकाऱ्यांचे कौतुक करून समाजहित अभियान प्रतिष्ठानच्या पुढील सामाजिक कार्याला शुभेच्छा दिल्या.
या वेळी समाजहित अभियान प्रतिष्ठान चे संस्थापक अध्यक्ष प्रमोद अंभोरे, उपाध्यक्ष आकाश साखरे, सचिव जनसेवक रमेश घनघाव, राज्य प्रसिध्दी प्रमुख शेख अझहर, सामाजिक कार्यकर्ते हरदिप सिंग बावरी, विनोद वाडेकर, संदिप वायवळ शंकर बनसोडे, दीपक बनसोडे, प्रकाश अंभोरे, अजय शिराळे, वैभव गायकवाड, आदी पदाधिकारी उपस्थित होते.

0 टिप्पण्या