विभागीय उत्कृष्ट तहसीलदार पुरस्कारप्राप्त कैलासचंद्र वाघमारे यांचा आमदार डॉ. रत्नाकरराव गुट्टे काका मित्र मंडळाकडून सत्कार
पालम प्रतिनिधी
पालम तालुक्याचे कर्तव्यदक्ष तहसीलदार कैलासचंद्रजी वाघमारे यांना "विभागीय उत्कृष्ट तहसीलदार" हा मानाचा पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल आमदार डॉ. रत्नाकरराव गुट्टे काका मित्र मंडळ, पालम तालुका यांच्या वतीने त्यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन जाहीर सत्कार करण्यात आला.
यावेळी पालम तालुका प्रभारी माधवराव (मामा) गायकवाड, तालुकाध्यक्ष चंद्रशेखरजी लांडगे, पालम नगराध्यक्ष जियाभाई पठाण, गटनेते तथा नगरसेवक उबेदभाई पठाण, संजय गांधी निराधार समिती योजना अध्यक्ष शेख गौसभाई, नगरसेवक अजीमभाई पठाण, संजय भाऊ थिट्टे, सय्यद विखरभाई, माजी उपसभापती गणेशराव (अण्णा) घोरपडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक तथा सरपंच अतुल सेठ धूळगुंडे, युवा नेते विजयराव गाणार, ओबीसी तालुकाध्यक्ष पवनजी सोन्नर, युवा नेते भगवानराव सिरस्कर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक गणेश भाऊ हत्तीआंबीरे, ज्येष्ठ नेते बाळासाहेब कुरे पाटील, युवा नेते गजाननराव देशमुख, ॲड. राहुल भैय्या शिंदे, खोरसचे सरपंच मदनेश्वर सुरणर, डीग्रसचे सरपंच पुंडलिक भाऊ डांगे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक शामराव मामा काळे, निवृत्ती भाऊ सारोळे यांच्यासह मित्र मंडळाचे पदाधिकारी व असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी तहसीलदार कैलासचंद्रजी वाघमारे यांच्या उत्कृष्ट प्रशासकीय कार्याचा गौरव करत त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.



0 टिप्पण्या