लोकशाहीर साहित्यरत्न डॉ. अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी

 


लोकशाहीर साहित्यरत्न डॉ. अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी



"अण्णाभाऊंचे विचार घराघरात पोहोचवणे हीच खरी जयंती" – गोसेवक नितीन जाधव गोगलगावकर


परभणी प्रतिनिधी :- राष्ट्रजन फाउंडेशन, परभणी यांच्या वतीने लोकशाहीर साहित्यरत्न डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या १०६ व्या जयंतीनिमित्त अभिवादन व पूजन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

याप्रसंगी शासकीय गुत्तेदार तुषार भाऊ मराठे यांनी उद्घाटक म्हणून उपस्थिती लावली, तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारतीय जनता पार्टीचे उद्योजक पवन निकम होते. तसेच लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे पुतळा समिती, परभणीचे अध्यक्ष समाजभूषण विश्वनाथराव गवारे, स्वच्छता दूत कमळाजी कवळे (मामा) आणि राष्ट्रजन फाउंडेशनचे अध्यक्ष गोसेवक नितीन जाधव गोगलगावकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमानिमित्त अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच परिसरात स्वच्छता अभियान राबवून समाजप्रबोधनाचा संदेश देण्यात आला.

यावेळी बोलताना गोसेवक नितीन जाधव गोगलगावकर म्हणाले की, "लोकशाहीर साहित्यरत्न डॉ. अण्णाभाऊ साठे यांची जयंती व पुण्यतिथी प्रत्येकाने घराघरात साजरी करून त्यांच्या विचारांचा आदर्श जीवनात स्वीकारला पाहिजे. त्यांचे कार्य आणि साहित्य समाजाला दिशा देणारे आहे. हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल."

कार्यक्रमाची सांगता "लोकशाहीर अण्णाभाऊ साठे की जय!" या घोषणांनी उत्साहपूर्ण वातावरणात झाली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या