कलेक्टर व एस पी यांच्याकडे गोवंश चोरीला जाऊ नये म्हणून प्रशासनाने तात्काळ कडक अंमलबजावणी करावी गोसेवक नितीन जाधव गोगलगावकर.
परभणी प्रतिनिधी :- गौरक्षक सेना महाराष्ट्र परभणी वतीने
मा. ना जिल्हाधिकारी साहेब व श्री पोलीस अधीक्षक पंकजजी कुमावत साहेब
पोलीसअधीक्षक कार्यालय परभणी मार्फत
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा साहेब ,महाराष्ट्र राज्य गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब
विषय- गाय नंदीबैल गोवंश चोरीचे प्रमाण वाढले आहे त्याच्यासाठी पुन्हा जनावरे चोरी होऊ नये म्हणून तात्काळ कडक कायदा करावा
२) परभणी येथील गोवंश चोरी झालेल्या घटनेचा सर्वांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करावे व त्यांचा पूर्ण ची टोळी सर्वांवर माहिती घेऊन कडक चौकशी कराव्या
३) परभणी येथे चोरी केलेले अटक केले होते त्यांना पुन्हा सोडून देण्यात आले पण त्यांना सोडून देऊ नये सर्व आरोपी पुन्हा अटक करावे व कशामुळे सोडले याचीही चौकशी करा
४) वसमत येथील एका शेतात कत्तलीसाठी डाबून ठेवलेले गोवंश जनावर सापडल्याने त्या घटनेचा निषेध व तसेच त्या घटनेचा पूर्ण चौकशी करून आरोपी अटक करावे गुन्हा दाखल कडकच पुन्हा असे करणार नाही यासाठी चांगल्या प्रकारची व्यवस्था करावी प्रशासन आहे
संदर्भ- सर्व गो संरक्षण पशुपक्षी प्राण्या गोमातेचे साठी मोठ्या प्रमाणात व्यवस्था करावी
महोदय वरील विषयानुसार गौरक्षक सेना महाराष्ट्र राज्याच्या वतीने निवेदनाच्या माध्यमातून या सर्व मागण्या राष्ट्र राजमाता गोमाता राज्य दर्जा असून सुद्धा रात्री बे रात्री गोवंश गोमातेचे चोरीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे व बऱ्याच जणांच्या ठिकाणी गोवंश डांबून ठेवल्या जाते कोणाच्या शेतात कोणाच्या घरात कोणाच्या परिसरात बऱ्याच ठिकाणी गोमास विक्री केली जाते दुकानावर सुद्धा अशा ठिकाणी कडक आरोपींना वर गुन्हा दाखल करून अटक करावे व जे कोणी जनावरे पकडत आहेत अशांच्या वर प्रशासनाने विशेष कॅमेरे व प्रत्येक पोलीस स्टेशनला किंवा नगरपालिकेच्या हद्दीतल्या किंवा ग्रामीण भागाच्या हातीतल्या सर्वांना आदेश देऊन कोणतेही ग्रामीण भागातले असो किंवा शहरातले असो जनावरे चोरी होणार नाहीत याच्यासाठी मोठे पाऊल उचलावे व अशा घटना पुन्हा घडणार नाहीत याची दक्षता घ्यावी गोमाता वाचली तर आपली संस्कृती टिकेल जय गोमाता या वाक्याला आपण अमलात आणून गोमाता वाचण्यासाठी प्रयत्न करावा ही कळकळी मागणी करण्यात आली
गोसेवक नितीन जाधव गोगलगावकर (प्रदेश मंत्री गौरक्षक सेना महाराष्ट्र) ,१००८ महामंडलिकेश्वर गोभक्त सचितानंद सरस्वती स्वामी महाराज पवार,गोप्रेमी चंपालाल देवतवाल ठाकूर, गोआयुर्वेदिक डॉ.गोविंद कामटे, गोप्रेमी अँड निवृत्ती कदम,अग्रवाल त्यांच्यासह गौरक्षक गोसेवक गोपालक उपस्थित होते
गौरक्षक सेना महाराष्ट्र प्रदेश मंत्री गोसेवक नितीन जाधव गोगलगावकर यांनी पत्रकार द्वारे माहिती दिली
प्रतिलिपी केंद्रीय गृहमंत्री राज्य गृहमंत्री मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पशुसंवर्धन विभाग मंत्री



0 टिप्पण्या