परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातशुद्ध देशी गोवंश जतन आणि संवर्धन दिन' उत्साहात साजरा करण्यात आला.
परभणी प्रतिनिधी:-परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात २२ जुलै २०२६ रोजी 'शुद्ध देशी गोवंश जतन आणि संवर्धन दिन' उत्साहात साजरा करण्यात आला.
पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विभाग, संकरित गो-पैदास प्रकल्प आणि सेंद्रिय शेती संशोधन व प्रक्षेपण केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमात कै. छगन आप्पा जाधव गोसंवर्धन चॅरिटेबल ट्रस्ट, गोगलगावचे अध्यक्ष व गोसेवक नितीन जाधव गोगलगावकर यांचा पुष्पगुच्छ देऊन विशेष सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरू मा. प्रा. डॉ. इंद्रमणी उपस्थित होते. प्रमुख वक्ते म्हणून पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. विश्वास मोहनराव साळुंखे यांनी शुद्ध देशी गोवंशाचे संवर्धन, वैज्ञानिक गोपालन आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेत गोसंवर्धनाचे महत्त्व यावर मार्गदर्शन केले.
यावेळी संशोधन संचालक डॉ. भगवान आसेवार, विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश आहिरे, कुलसचिव पूर्वा काळे, निमंत्रक श्रीमती भाग्यश्री जाधव-भोसले, विद्यापीठ अभियंता इंजि. दीपक कशाळकर, तसेच ज्येष्ठ शास्त्रज्ञ, गोशाळा प्रतिनिधी आणि विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. जी. के. लोंढे यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. दत्ता बैनवाड यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉ. प्रभाकर पडघन यांनी मानले.
संशोधन संचालनालयाच्या सभागृहात झालेल्या या
कार्यक्रमाला गोशाळा संचालक, गोपालक, गोरक्षक, शेतकरी आणि कृषी विद्यापीठातील अधिकारी-कर्मचारी यांची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली.
गोवंश संवर्धनासाठी कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करून समाजात जनजागृती करण्याचा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.




0 टिप्पण्या