पुयनी येथे उमाबाई गिनगिने यांच्या पुण्यतिथीनिमित्त हरिकीर्तन व अन्नदान सोहळा भक्तिमय वातावरणात संपन
पालम प्रतिनिधी:-
पालम तालुक्यातील पुयनी येथे पुण्यश्लोक उमाबाई गिनगिने यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित हरिकीर्तन व अन्नदान सोहळा मोठ्या भक्तिभावात संपन्न झाला. या धार्मिक कार्यक्रमात पंचक्रोशीतील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कीर्तनाचा लाभ घेतला.
या सोहळ्याचे मुख्य आकर्षण ठरले ह.भ.प. राम महाराज बनसोडे यांचे सुश्राव्य हरिकीर्तन. त्यांनी संत शिरोमणी जनाबाई यांच्या अभंगावर रसाळ आणि विचारप्रवर्तक निरूपण करत उपस्थितांना भक्ती, सेवा आणि मानवतेचा संदेश दिला.
यावेळी राम महाराजांनी उमाबाई गिनगिने यांच्या सेवाभावी जीवनकार्याचा गौरव करत, त्यांनी शेतीतून मिळणारे उत्पन्न गोरगरिबांच्या सेवेसाठी आणि अन्नदानासाठी अर्पण केल्याचे सांगितले. त्यांचा सेवाभाव समाजासाठी प्रेरणादायी असल्याचेही त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाला परिसरातील आजी-माजी लोकप्रतिनिधी, सरपंच, पोलीस पाटील, विविध संस्थांचे पदाधिकारी तसेच पंचक्रोशीतील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. महिला भजनी मंडळ, मृदंगाचार्य आणि गायकांच्या साथीने कीर्तन अधिकच रंगले.
कार्यक्रमाचे नियोजन तुकाराम माधवराव गिनगिने (माजी सरपंच) तसेच उमाबाई राजाराम विश्वस्त मंडळ, पुयनी यांच्या वतीने करण्यात आले. हरिकीर्तनानंतर उपस्थित सर्व भाविकांसाठी महाप्रसादाची उत्तम व्यवस्था करण्यात आली.



0 टिप्पण्या