पालम तालुक्यातील व्हॉईस ऑफ मीडिया पत्रकार संघटनेच्या तालुका कार्यकारिणीची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

 पालम तालुक्यातील व्हॉईस ऑफ मीडिया पत्रकार संघटनेच्या तालुका कार्यकारिणीची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.



पालम प्रतिनिधी 

पालम येथील हॉटेल शुभलेश्वर येथे झालेल्या विशेष बैठकीत नवीन कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली. यावेळी मराठी पत्रकारितेचे जनक बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.


या निवड प्रक्रियेत दैनिक सामनाचे तालुका प्रतिनिधी गुणवंत सराफ यांची व्हॉईस ऑफ मीडिया पालम तालुकाध्यक्षपदी एकमताने बिनविरोध निवड झाली.तर चांद तांबोळी यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली.


कार्यकारिणीत सुनील कवटकर यांची कार्याध्यक्ष, बालासाहेब फुलपगार यांची सचिव, केरबाजी बहिरवा यांची कोषाध्यक्ष, रुक्माजी गिणगिणे यांची मार्गदर्शक, अंकुश वाघमारे यांची संघटक, प्रा. विनोद कांबळे यांची प्रसिद्धीप्रमुख, अंबादास ठाकूर यांची सल्लागार, तसेच गोविंद सोलेवाड, शेषराव सोपणे, भास्कर लांडे,रावसाहेब वावळे, गणेश काकडे आणि संग्राम खेडेकर यांची सदस्य म्हणून निवड करण्यात आली.


या बैठकीला परभणी जिल्हाध्यक्ष कैलास चव्हाण, ग्रामीण जिल्हाध्यक्ष बालासाहेब काळे यांच्यासह पत्रकार बांधवांची उपस्थिती होती. मान्यवरांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून संघटनात्मक कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या