पालम पंचायत समिती येथे व्हीबीजी रामजी योजना संदर्भात मार्गदर्शनपर बैठकीचे आयोजन

 पालम पंचायत समिती येथे व्हीबीजी रामजी योजना संदर्भात मार्गदर्शनपर बैठकीचे आयोजन 



पालम प्रतिनिधी 

पालम पंचायत समिती येथे व्हीबीजी रामजी योजना संदर्भात मार्गदर्शनपर बैठकीचे आयोजन करण्यात आले. या बैठकीला तालुक्यातील रोजगार सहाय्यक, अधिकारी आणि विविध मान्यवरांची उपस्थिती लाभली.



बैठकीच्या अध्यक्षस्थानी पंचायत समितीचे सभापती बाळासाहेब ढोले होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून सहाय्यक गटविकास अधिकारी श्री अंभोरे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी रोजगार सहाय्यक संघटनेचे अध्यक्ष राजधर भोसले यांच्या हस्ते सभापती, सहाय्यक गटविकास अधिकारी तसेच उपस्थित मान्यवरांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.



यावेळी सभापती बाळासाहेब ढोले यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सांगितले की, गावपातळीवर राजकीय मतभेद आणि आरोप-प्रत्यारोप होत असले तरी घरकुल, सिंचन विहीर व इतर विकासकामे नियमांनुसार आणि पारदर्शकपणेच करण्यात यावीत. कोणतेही काम दबावाखाली करू नये तसेच बोगस कामांना थारा देऊ नये, असे आवाहन त्यांनी केले.



सहाय्यक गटविकास अधिकारी श्री अंभोरे यांनी व्हीबीजी रामजी योजना राबविताना घ्यावयाची काळजी, योजनेचे नियम आणि अंमलबजावणीबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.

तसेच कार्यक्रम व्यवस्थापन अधिकारी श्री माधव कदम यांनीही व्हीबीजी रामजी योजनेची उद्दिष्टे आणि विविध कामांबाबत थोडक्यात माहिती दिली.

जेष्ठ अनुभवी व रोजगार सहाय्यक संघटनेचे मार्गदर्शक, श्री शेषराव सोपणे यांनी, नवीन जी रामजी योजना, लाभार्थी व येणाऱ्या अडचणी, माहिती, मार्गदर्शन व पर्यायी व्यवस्था या विषयावर प्रश्न विचारले,

या बैठकीला तालुक्यातील रोजगार सहाय्यक, टीएसपी कर्मचारी, संतोष कदम, रमेश हणूमंते, विजयकुमार हाणवते, उपसभापती बालाजी बरडे, पंचायत समिती सदस्य माधवराव सकत तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या