33 वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर आरोग्य सहाय्यिका आशा शेळके यांना निरोप

 33 वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर आरोग्य सहाय्यिका आशा शेळके यांना निरोप



पालम प्रतिनिधीय

पालम तालुक्यातील चाटोरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य सहाय्यिका आशा गणपतराव शेळके-लांडे या तब्बल 33 वर्षे 6 महिन्यांच्या प्रदीर्घ व समर्पित सेवेनंतर मंगळवारी (दि. 30) सेवानिवृत्त झाल्या. त्यांच्या गौरवशाली सेवेला सलाम करत प्राथमिक आरोग्य केंद्रात निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले.

या कार्यक्रमाला आरोग्य अधिकारी डॉ. डी.डी. गुरमे, डॉ. होळबे, आरोग्य सहाय्यक बंडेवार, माधव माटे, रामेश्वर जोशी, आरोग्य सहाय्यिका सुनिता काडळगिरी, अंकुश कुंटवार, राम लटपटे, उमा कुंजटवार, सदानंद गडगीळे, केदार शेवटकर, ऋषीकेश कदम, सुनंदा पाळखे, बेबी राठोड, मीरा चांबळे, जीएनएम अनिता साबळे, ज्योती किरडे, राणी डोणे, ताई डोणे, सुरज उदावंत यांच्यासह सहकारी व मान्यवर उपस्थित होते.

यावेळी मान्यवरांच्या हस्ते आशा शेळके यांचा शाल, पुष्पहार व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना शेळके यांनी आपल्या सेवाकाळातील अनुभव सांगत, प्रामाणिकपणे व निस्वार्थ भावनेने रुग्णसेवा करण्याचा प्रयत्न केला, असे नमूद केले. सर्वसामान्य रुग्णाला केंद्रस्थानी ठेवून मानवतेची जपणूक करत सेवा बजावल्याच्या आठवणींनाही त्यांनी उजाळा दिला.


कार्यक्रमात बोलताना डॉ. डी.डी. गुरमे यांनी आशा शेळके यांच्या प्रेमळ, संवेदनशील आणि सेवाभावी स्वभावाचे कौतुक केले. त्यांनी आपल्या कार्यतत्परतेमुळे सहकारी, वरिष्ठ अधिकारी तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या मनात कायमचे स्थान निर्माण केल्याचे त्यांनी सांगितले.

समारंभात उपस्थितांनी शेळके यांच्या पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देत त्यांच्या आरोग्यदायी, आनंदी आणि सुखमय निवृत्त जीवनासाठी सदिच्छा व्यक्त केल्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या