पालम येथे गोसावी समाजाच्या स्मशानभूमीच्या मोजणी व संरक्षण भिंतीची मागणी

 पालम येथे गोसावी समाजाच्या स्मशानभूमीच्या मोजणी व संरक्षण भिंतीची मागणी




शेत सर्वे नं. 184 मधील 0.06.71 आर जमीन स्मशानभूमीसाठी – नगर पंचायतकडे निवेदन


पालम प्रतिनिधी :- पालम जि. परभणी येथील गोसावी समाज बांधवांनी नगर पंचायत पालम येथे निवेदन देऊन स्मशानभूमीच्या जागेची अधिकृत मोजणी करून संरक्षण भिंत उभारण्याची मागणी केली आहे.

सदर जमीन शेत सर्वे नं. 184 मध्ये असून 7/12 नोंदीनुसार 0.06.71 आर क्षेत्र स्मशानभूमीसाठी नोंदवलेले आहे.

समाज बांधवांनी नमूद केले की, जागेची मोजणी व संरक्षण भिंत उभारली नाही तर भविष्यात अडचणी निर्माण होऊ शकतात. त्यामुळे तातडीने काम करण्यात यावे अशी विनंती करण्यात आली आहे.


मुख्य मुद्दे :- ठिकाण पालम, जि. परभणी,सर्वे नंबर: 184,क्षेत्रफळ: 0.06.71 आर, संरक्षण भिंत व जागेची मोजणी,करून चतुस्सिमा नियमित करून द्यावी,असे निवेदन गोसावी समाज बांधवांच्या वतीने,कुशांबर अवधूत पुरी,रा. स्वामी समर्थ नगर, पालम यांनी

“समाजाच्या हक्कासाठी पुढाकार – गोसावी समाजाची ठाम भूमिका”अशा अशयातून समाजहितासाठी पुढाकार घेतला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या