प्रत्येक नागरिकांनी अन्नदानासाठी पुढे यावे— गोसेवक नितीन जाधव गोगलगावकर यांचे आवाहन

 


प्रत्येक नागरिकांनी अन्नदानासाठी पुढे यावे— गोसेवक नितीन जाधव गोगलगावकर यांचे आवाहन



 परभणी प्रतिनिधी : राम कृष्ण हरी अन्नछत्र, सरकारी हॉस्पिटल परभणी यांच्या वतीने नागरिकांना महत्त्वाचे आवाहन करण्यात आले आहे. कोणत्याही महापुरुषांची जयंती-पुण्यतिथी, वाढदिवस, वर्धापन दिन किंवा इतर कार्यक्रमांवरील अनावश्यक खर्च टाळून गोरगरिब रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांसाठी अन्नदान करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

"अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे… अन्न हे जीवन आहे… कुणीही उपाशी राहू नये" ही भावना प्रत्येकाच्या मनात असावी, असे आवाहन करण्यात आले.

७ वर्षांपासून अखंड सेवा

राम कृष्ण हरी अन्नदान छत्राचे संस्थापक

खिचडी वाले गुरुजी ह.भ.प. गोविंद महाराज पौढे गुरुजी

यांच्या मार्गदर्शनाखाली मागील ७ वर्षांपासून दररोज सकाळी ८:३० वाजता रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना मोफत खिचडी वाटप करण्यात येते.

दररोज एक वेगळा यजमान,नियमित अन्नदान सेवा,मानव सेवा हीच ईश्वर सेवा,या सेवेत सहभागी सदस्य:गोसेवक नितीन जाधव गोगलगावकर, अमित लांडे,डॉ. मंगेश रणेर, किशोर डोंबे, गजानन लोंढे,विशाल पाटील, माणिकराव अंधारे, स्वप्निल रणेर,निशाताई लाठकर, व्यवस्थापक अशोक लोंढे व सर्व सेवेकरी

नागरिकांनी अन्नदानासाठी पुढे यावे असे आवाहन करण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या