संतोष मुरकुटे यांचे आवाहन – “सतर्क रहा, सुरक्षित रहा!”

 संतोष मुरकुटे यांचे आवाहन – “सतर्क रहा, सुरक्षित रहा!”



संभाजीनगर प्रतिनिधी :- राज्यात दिवसेंदिवस तापमानाचा पारा वाढत असून उष्णतेची तीव्रता मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. नागरिकांनी आपल्या आरोग्याची विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

भारतीय जनता पार्टीचे मा. जिल्हाध्यक्ष संतोष मुरकुटे यांनी नागरिकांना उष्णतेपासून बचाव करण्यासाठी महत्त्वपूर्ण सूचना दिल्या आहेत.

👉 नागरिकांनी जास्तीत-जास्त पाणी पिण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

👉 दुपारी १२ ते ४ या वेळेत विनाकारण घराबाहेर पडणे टाळावे.

👉 ओआरएस, लिंबू सरबत, ताक, लस्सी यांसारख्या पेयांचे सेवन करावे.

👉 लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि आजारी व्यक्तींनी विशेष काळजी घ्यावी.

☀️ वाढत्या उकाड्यामुळे नागरिकांनी सतर्क राहून स्वतःची व कुटुंबाची काळजी घेणे गरजेचे आहे.

 संतोष मुरकुटे यांचे आवाहन – “सतर्क रहा, सुरक्षित रहा!”

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या