नरळद-इरलद येथे भव्य यात्रा महोत्सवाचे आयोजन
गंगाखेड प्रतिनिधी :- गंगाखेड तालुक्यातील मौजे नरळद-इरलद येथे श्री महाकाली देवईमाय संस्थानतर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही भव्य यात्रा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या धार्मिक सोहळ्यामुळे परिसरातील भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सोमवार दिनांक २७ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ९ वाजता श्रींची महापूजा, अभिषेक, घटस्थापना तसेच श्री महाकाली देवीची महापूजा होणार आहे. तसेच दररोज रात्री ९ ते ११ या वेळेत गोंधळ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
यानंतर शुक्रवार दिनांक १ मे २०२६ रोजी वैषाख पौर्णिमेनिमित्त भव्य यात्रा महोत्सव साजरा केला जाणार असून रात्री १२ वाजून ५ मिनिटांनी श्रींची पालखी (छबिना) मिरवणूक काढण्यात येणार आहे. यावेळी ह.भ.प. तुळशीराम महाराज देवकर हे दंडवत घेणार आहेत.
तसेच शनिवार दिनांक २ मे २०२६ रोजी सकाळी १० वाजता महाप्रसाद (भंडारा) आयोजित करण्यात आला आहे.
या धार्मिक कार्यक्रमास उपस्थित राहून दर्शन व महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री महाकाली देवईमाय संस्थान व समस्त गावकरी मंडळींकडून करण्यात आले आहे.


0 टिप्पण्या