ग्रामीण विकासाला चालना • ४६५.५५ कोटी रुपयांचा निधी मंजूर • ग्रामरोजगार सेवकांना मानधनात वाढ
परभणी प्रतिनिधी :- महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत जिल्ह्यात विविध विकासकामांना गती देण्यात येत असून रोजगारनिर्मितीला चालना मिळत आहे. प्राप्त प्रस्तावांच्या आधारे जिल्ह्यात एकूण ४८७५ कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. या कामांसाठी सुमारे ४६५.५५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
या योजनेत जलसंधारण, वृक्षलागवड, बंधारे, शेतीसंबंधित कामे तसेच ग्रामीण पायाभूत सुविधा उभारणीची कामे करण्यात येणार आहेत. यामुळे ग्रामीण भागात रोजगार उपलब्ध होण्याबरोबरच गावांच्या विकासालाही गती मिळणार आहे.
▪ जिल्ह्यात ४८७५ कामांना प्रशासकीय मान्यता
▪ एकूण ४६५.५५ कोटी रुपयांचा निधी मंजूर
▪ जलसंधारण, शेती व पायाभूत सुविधा विकासावर भर
▪ ग्रामरोजगार सेवकांना दरमहा ₹८,००० मानधन
▪ अतिरिक्त सुविधांसाठी ₹२,५०० पर्यंत तरतूद
▪ शासन निर्णय १० सप्टेंबर २०२५ रोजी निर्गमित
या निर्णयामुळे ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती होण्याबरोबरच गावपातळीवरील विकासकामांना गती मिळणार असल्याचे प्रशासनाने सांगितले.


0 टिप्पण्या