अवैध रेती वाहतूक करणारा हायवा पकडला; दोन जणं ताब्यात.

 अवैध रेती वाहतूक करणारा हायवा पकडला; दोन जणं ताब्यात.

   


पालम प्रतिनिधी : पालम शहरातील पेठपिंपळगाव चौकाजवळ अवैध रेती वाहतूक प्रकरण उघडकीस आले असून पोलिसांनी दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे. ही कारवाई 17 मार्च रोजी रात्री 10: 45 वाजण्याच्या सुमारास करण्यात आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,आरोपी मनोहर सखाराम महाजन (वय 28, रा. वाणीपिंपळगाव) हा त्याच्या ताब्यातील TATA कंपनीच्या हायवा (क्र. MH 22 AN 5569) वाहनातून विनापरवाना अवैधरीत्या रेती वाहतूक करत होता. या प्रकरणात हायवा मालक गंगाधर तालेराव ढगे (रा. रहाटी, ता. पालम) यांचाही सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे.

कारवाईदरम्यान पोलिसांनी सुमारे 10 लाख रुपये किमतीचा हायवा आणि अंदाजे 14 हजार रुपये किमतीची चार ब्रास रेती असा एकूण 10 लाख 14 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

         या प्रकरणी पो.काॅ.सुदाम लक्ष्मणराव धुळगुंडे यांच्या फिर्यादीवरून पोलीस ठाणे पालम येथे भारतीय न्याय संहिता 2023 मधील कलम 303(2), 3(3) तसेच महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम कलम 48(7)(बी) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर कारवाई नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या मार्गदर्शनाखाली नेमण्यात आलेल्या विशेष पथकाने केली असून पालम पोलीस स्टेशनचे पो.नि एस.के.खटाणे यांच्या आदेशानुसार गुन्हा करण्यात आला असून पुढील तपास पो.काॅ. एस.पी. कोलमवाड करीत आहेत.सध्या दोन्ही आरोपी पोलिसांच्या ताब्यात असून पुढील चौकशी सुरू आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या