लाकूडमुक्त, प्रदूषणमुक्त होळी साजरी करण्याचे आवाहन 🌿
— गौरक्षक सेना मराठवाडा विभाग
परभणी प्रतिनिधी :- होळी सणाच्या निमित्ताने पर्यावरणपूरक व संस्कृतीस साजरी अशी लाकूडमुक्त होळी साजरी करण्याचे आवाहन गौरक्षक सेना मराठवाडा विभाग यांच्या वतीने करण्यात आले आहे.
नितीन जाधव गोगलगावकर यांनी नागरिकांना गोमातेच्या शेण-गोमूत्रापासून बनवलेल्या गोमय गौरी व गोमय केक वापरून होळी साजरी करण्याचे आवाहन केले आहे.
🔸 का आवश्यक आहे लाकूडमुक्त होळी?
झाडतोड थांबवून पर्यावरण संरक्षण
प्रदूषणमुक्त व आरोग्यदायी उत्सव
गोशाळांना उत्पन्नाचा आधार
भारतीय संस्कृती व परंपरेचे जतन
🔸 कशी साजरी करावी?
लाकूड न वापरता गोमय गौरी/गोमय केक वापरा
घरोघरी, सार्वजनिक ठिकाणी व मंदिर परिसरात पर्यावरणपूरक होळी
स्थानिक गोशाळांतून किंवा उपलब्ध दुकानांतून गोमय उत्पादने खरेदी करा
🔸 समाजहिताचा संदेश
गोमय उत्पादनांच्या वापरामुळे गोमातेच्या चारा-पाण्यासाठी खर्चाची सोय होऊन गोसंवर्धनास हातभार लागेल.
“वृक्षवल्ली आम्हा सोयरे” या भावनेतून होळी 2026 पासून सर्वत्र गोमय होळी साजरी करण्याचा संकल्प करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
👉 काळाची गरज: प्रदूषणमुक्त होळी, गोमातेचे संरक्षण आणि आपली संस्कृती जपा.



0 टिप्पण्या