ग्रामीण भागात तारेवरील आकड्यांमुळे,मिटर धारक ग्राहकांचा थकीत बिल भरायला विरोध.
परंडा प्रतिनिधी-विजय शेवाळे
करमाळा तालुक्यातील ग्रामीण भागासह वाड्या वस्त्यांवर
मोठ्या प्रमाणात तारेवर आकडे टाकून वीज चोरून वापरल्याने, नियमित वीज बिल भरणारे ग्राहकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
अनेकदा तारेवर आकडे टाकताना त्या ठिकाणी स्पार्किंग होऊन, कधी कधी तारेला तारा चे घर्षण झाल्याने जोरात जाळ होतो, यामुळे लाईट अचानक बंद होते.त्यामुळे विज ग्राहकांचे लाईट वरील, उपकरणे जळतात,व बंद पडतात,
दिवसा ढवळ्या तारेवर आकडे दिसून ही वीज कर्मचाऱ्यांच दुर्लक्ष होताना दिसतेय , यामुळे नियमित वीज बिल भरणारे ग्राहकांनची मानसिकता खराब होते.
वर्षानुवर्षे आकडे टाकून नियमबाह्य लाईट वापरणाऱ्यावर कोणत्याही प्रकारची कार्यवाही केली जात नाही, अथवा वायरमन त्यांना जाब ही विचारत नाहीत ,आणि आपण मात्र इमानदारीने लाईट बिल भरत बसलोय अशी ग्राहक चर्चा करत आहेत.
गेली दीड वर्ष झाले , ज्या ज्या थकबाकी दारांची घरगुती लाईट कनेक्शन कट केले ते सर्व लोक आरामात ,तारेवर आकडे टाकून लाईट वापरत आहेत ,
महावितरणने या गोष्टीकडे लक्ष देऊन, यावर वेळीच कार्यवाही नाही केली तर ,नियमित वीज बिल भरणारे ग्राहक ही तारेवर आकडे टाकूनच लाईट घेतील, अशी आजची वास्तुतिथी निर्माण झाली आहे.
मात्र या सर्व गोष्टींमुळे महावितरणच्या गलथान कारभारामुळे,आपल्याच हाताने,आपल्याच पायावर दगड पाडून घेतल्या सारखे झाले आहे.यामुळे वीज बिल वसुली पथकाला याचा नाहक त्रास सहन करायची वेळ आली आहे ,

0 टिप्पण्या