गंगाखेड विधानसभा मतदार याद्या पुनर्निरिक्षणासाठी संतोष भाऊ मुरकुटे यांची BLA-1 विधानसभा प्रमुखपदी नियुक्ती

 गंगाखेड विधानसभा मतदार याद्या पुनर्निरिक्षणासाठी संतोष भाऊ मुरकुटे यांची BLA-1 विधानसभा प्रमुखपदी नियुक्ती



गंगाखेड (प्रतिनिधी) – भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्र प्रदेश यांच्या वतीने राज्यभर मतदार याद्यांचे विशेष पुनर्निरिक्षण अभियान (SIR) राबविण्यात येत आहे. या अभियानाच्या अनुषंगाने गंगाखेड विधानसभा मतदारसंघासाठी BLA-1 विधानसभा प्रमुख म्हणून भाजपा नेते आदरणीय संतोष भाऊ मुरकुटे यांची निवड करण्यात आली आहे.

पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी तसेच मतदार याद्यांमध्ये अचूकता राखण्यासाठी हे अभियान महत्त्वाचे मानले जात आहे. संतोष भाऊ मुरकुटे हे संघटन कौशल्य, कार्यकर्त्यांशी सुसंवाद आणि पक्षनिष्ठा यासाठी ओळखले जातात. त्यांच्या निवडीमुळे गंगाखेड विधानसभा क्षेत्रात अभियानाला अधिक गती मिळेल, असा विश्वास कार्यकर्त्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

या निवडीबद्दल भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून संतोष भाऊ मुरकुटे यांचे अभिनंदन करण्यात येत असून, आगामी काळात ते मतदार याद्या पुनर्निरिक्षण अभियान प्रभावीपणे राबवतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या