कौडगाव झेड.पी शाळेची शैक्षणिक सहल छत्रपती संभाजीनगर कडे रवाना.

शैक्षणिक सहल छत्रपती संभाजीनगर कडे रवाना.कौडगाव जिल्हा परिषद शाळेचा आदर्श उपक्रम... गटशिक्षणाधिकारी शशिकांत मुंढे



शैक्षणिक सहलीस हिरवा झेंडा दाखवून रवाना करताना, 

गटशिक्षणाधिकारी व शिक्षण विस्तार यांची खास उपस्थिती.



गंगाखेड प्रतिनिधी :- दि 8/01/2026 रोजी सकाळी 7:00वाजता जि प प्रा शा कौडगाव येथील 55 विद्यार्थी यांची शैक्षणिक सहल बस ने छत्रपती संभाजीनगर,वेरूळ अजिंठा,दौलताबात किल्ला,ऐतिहासिक लेण्या,भद्रा मारोती,येथे जात असताना 



विद्यार्थी व शिक्षक यांचे अभिनंदन करून, शुभेछा देवून प्रवासास शुभकामना देण्यासाठी गंगाखेड पंचायत समिती कर्तव्यदक्ष व कार्यतत्पर गटशिक्षणाधिकारी माश्री शशिकांत मुंढे साहेब व शिक्षण विस्तार अधिकारी सन्माननीय श्री बालाजी दराडे, 

सन्माननीय तंत्रस्नेही व आदर्श शिक्षक श्री विठ्ठल चामे,श्री माधव लातुरे,श्रीमती शिवमाला लांडगे,यांनी शुभेच्छा दिल्या व ही सहल छत्रपती संभाजीनगर येथील सर्व प्रेक्षणीय स्थळे,ऐतिहासिक किर्तीचा दौलताबात किल्ला, जागतीक प्रसिद्ध लेण्या इतर ठिकाणी अभ्यासासाठी जात असताना सकाळ च्या एवढ्या थंडीतही श्री मुढे साहेब गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी व श्री विठ्ठल चामे सर,श्रीमती शिवमाला माधव लातुरे यांनी एस टी बस चे चालक यांचा मुख्याध्यापक श्री संतोष जगताप व शिक्षक श्री विष्णु घुले, श्री संभाजी जमदाडे, शिक्षिका श्रीमती जगताप मॅडम, श्रीमती भुमरे मॅडम यांचाही पुष्पहार,शाल घालून सत्कार करून अभ्यास दौर्यासाठी जात असताना सर्वांचे कौतुक केले  व श्री बालाजी दराडे शिक्षण विस्तार अधिकारी यांनी श्रीफळ फोडून आणि मा श्री शशिकांत मुंढे साहेब गटशिक्षणाधिकारी यांनी बस गाडीस "हिरवा झेंडा" दाखवून शुभेच्छा सह सहलीस जाणार्या कौडगाव ची आदर्श टिम यांना रवाना केले.कार्यतत्पर गटशिक्षणाधिकारी व शिक्षण विस्तार अधिकारी यांनी सकाळ च्या सात वाजता ही शाळा शिक्षक व विद्यार्थी यांच्या उतूंग व आदर्श वाटचालीसाठी स्वतः उपस्थित राहून शुभकामना दिल्या या मुळे शिक्षण विभाग शिक्षक यांच्या पाठीशी असल्याचा मोठा संदेश या क्षणातुन दिसून येतो आहे... या वेळी टिपलेली काही अविस्मरणीय क्षण.एक पाऊल गंगाखेड आदर्श शैक्षणिक पॅटर्न कडे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या