सामाजिक अंकक्षणाच्या नावाखाली दबाव व लाचखोरीचा आरोप महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतील गंभीर प्रकार उघड

 



सामाजिक अंकक्षणाच्या नावाखाली दबाव व लाचखोरीचा आरोप,महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतील गंभीर प्रकार उघड

प्रतिनिधी परभणी :-

सामाजिक अंकक्षण पारदर्शकता सोसायटी मंत्रालय, मुंबई यांच्या आदेशानुसार महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजना (MGNREGA) अंतर्गत 2024-25 या कार्यकाळातील कामांची तपासणी व माहिती शासनापर्यंत पारदर्शकपणे पोहोचवण्याचा उद्देश आहे. मात्र या मोहिमेचा गैरफायदा घेत काही कार्यान्वित कर्मचारी दबाव, धमकी व आर्थिक लुबाडणूक करत असल्याचे गंभीर आरोप समोर आले आहेत.

 जातीय दहशत व 20 हजारांची मागणी

ग्रामपंचायत तांबुळगाव येथे सामाजिक अंकक्षणासाठी नियुक्त असलेल्या कार्यान्वित कर्मचारी चंदाराणी खंदारे यांनी ग्रामरोजगार सहाय्यक शेषराव मोहणाजी सोपणे यांना जातीय दहशत दाखवत 20,000 रुपयांची मागणी केल्याचा आरोप आहे.

अधिकारी बदलण्याची मागणी दुर्लक्षित

या प्रकाराबाबत रोजगार सहाय्यक सोपणे यांनी

 26 डिसेंबर 2025 रोजी दुपारी 12:21 वाजता

सामाजिक अंकक्षण पालम तालुक्यातील निरीक्षक अधिकारी रोहन टिकार यांना 49 सेकंदांचा फोन करून संबंधित महिला अधिकारी बदलण्याची मागणी केली. मात्र ही मागणी फेटाळण्यात आली.

दस्तऐवज दिल्यानंतरही बदनामी

27 डिसेंबर 2025 रोजी आवश्यक कागदपत्रे देऊन उर्वरित दस्तऐवज 29 डिसेंबरला देणार असल्याचे लेखी दिल्यानंतरही,

संबंधित कर्मचाऱ्यांनी गावात

“रोजगार सहाय्यकाने दीड कोटींचे बोगस कामाचे पैसे खाल्ले आहेत”

अशी चर्चा पसरवून बदनामी केल्याचा आरोप आहे.

नोकरीवरून काढण्याची धमकी

 28 डिसेंबर 2025 रोजी पालम तालुक्यातील निरीक्षक अधिकारी व अन्य व्यक्तीने गावात बोलावून

“रोजगार सहाय्यक काढून टाकण्यात येईल”

असे जाहीरपणे सांगितल्याने वातावरण अधिकच तणावपूर्ण झाले.

 गावात असंतोष पसरवण्याचा आरोप

पैसे देण्यास नकार दिल्यानंतर, काही समाजकंटकांना दारू पाजून गावात असंतोष निर्माण करणे, तसेच रोजगार सहाय्यकास मानसिक व बौद्धिक त्रास देण्यात आल्याचा आरोप निवेदनात नमूद आहे.

 प्रशासनाकडे तक्रार व बहिष्कार

या प्रकरणामुळे मानसिक स्थिती बिघडल्याने,

रोजगार सहाय्यक सोपणे यांनी

पंचायत समिती, पालम

जिल्हाधिकारी कार्यालय, परभणी

यांच्याकडे सामाजिक अंकक्षण व विशेष ग्रामसभेवर बहिष्कार असल्याचे निवेदन सादर केले आहे.

 जबाबदारी निश्चित करण्याची मागणी

निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे की,

“या प्रकरणातून पुढे काहीही अनुचित घडल्यास त्याची पूर्ण जबाबदारी सामाजिक अंकक्षण पारदर्शकता सोसायटी मंत्रालय मुंबई, पालम तालुक्यातील कार्यालयीन प्रमुख अधिकारी व संबंधित कार्यान्वित कर्मचारी चंदाराणी खंदारे यांची राहील.”

संपादकीय टीप:

सामाजिक अंकक्षण ही पारदर्शकतेसाठीची प्रक्रिया असून, तिचा वापर दबाव व लाचखोरीसाठी होत असल्यास तात्काळ चौकशी व कठोर कारवाई होणे आवश्यक आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या