क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती बालिका दिन म्हणून उत्साहात साजरी

 क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती बालिका दिन म्हणून उत्साहात साजरी 



डॉ. बाबासाहेब आंबेडकर जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा, ढवळकेवाडी



गंगाखेड प्रतिनिधी :- ढवळकेवाडी  दि. 03 जानेवारी 2026  डॉ. बाबासाहेब आंबेडकर जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा, ढवळकेवाडी येथे Savitribai Phule यांची 195 वी जयंती बालिका दिन म्हणून अत्यंत उत्साहात साजरी करण्यात आली.



कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक व मरडसगाव केंद्राचे केंद्रप्रमुख श्री. रावसाहेब चंदे होते. प्रमुख महिला अतिथी म्हणून ढवळकेवाडीच्या महिला पोलीस पाटील श्रीमती सुवर्णाताई राठोड उपस्थित होत्या.



मार्गदर्शक म्हणून मा. श्री. व्यंकट शिवलिंगप्पा ढेले (माजी मुख्याध्यापक, जि.प. गुंजेगाव पॅटर्न शाळा तथा ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी, पंचायत समिती पालम) यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.

या प्रसंगी अंगणवाडी सेविका, मदतनीस, गावातील महिला पालक, शिक्षकवृंद, विद्यार्थी व सावित्रीबाईंच्या वेषभूषेत आलेल्या मुली मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. बालिका दिनानिमित्त सर्व मान्यवरांचा हार, शाल, बुके व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

 शाळा होणार गुंजेगाव पॅटर्न

प्रस्ताविकात शिक्षक श्री. माधव लातुरे यांनी शाळेच्या भौतिक सुविधा, शाळा व्यवस्थापन समिती व ग्रामपंचायतीच्या सहकार्यामुळे विद्यार्थ्यांना आनंददायी व गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यावर भर असल्याचे सांगितले.

क्रिडा, स्पर्धा परीक्षा, विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून ही शाळा जिल्ह्यातील आदर्श (मॉडेल) शाळा बनवण्याचा संकल्प व्यक्त केला.

विद्यार्थिनींनी सावित्रीबाई फुले यांच्या कार्यावर प्रभावी भाषणे सादर केली.

महिला पोलीस पाटील श्रीमती सुवर्णाताई राठोड यांनी मुलींना शुभेच्छा देत गावकऱ्यांनी शाळेसाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले.

मुख्यमंत्री स्वच्छ शाळा सुंदर शाळा अभियानात यशाची संधी

मार्गदर्शक मा. श्री. व्यंकट शिवलिंगप्पा ढेले यांनी शाळेची स्वच्छता, प्रगती पाहून ही शाळा मुख्यमंत्री स्वच्छ शाळा सुंदर शाळा अभियानात प्रथम क्रमांक मिळवू शकते, असा विश्वास व्यक्त केला.

गुंजेगाव पॅटर्न कसा तयार झाला, पालकांची जबाबदारी, शिक्षकांचे योगदान व लोकसहभाग यावर त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.

अध्यक्षीय भाषणात श्री. रावसाहेब चंदे यांनी 2025–26 या वर्षात गंगाखेड तालुक्यातून प्रथम क्रमांक मिळवून परभणी जिल्ह्यात शाळेचे नाव उज्वल करण्याचा निर्धार व्यक्त केला.

 सूत्रसंचालन व आभार

कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन श्री. महादेव जाधव यांनी केले, तर आभार प्रदर्शन श्री. श्रीकांत शिंदे यांनी केले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक श्री. रावसाहेब चंदे यांच्या मार्गदर्शनाखाली

श्री. केशवराव सोनवने, श्री. भास्कर फड, श्री. माधव लातुरे, श्री. श्रीकांत शिंदे, श्री. महादेव जाधव, श्री. विनोद बडे तसेच विद्यार्थी-विद्यार्थिनींनी परिश्रम घेतले.

ढवळकेवाडी शाळा लवकरच गंगाखेड तालुका व परभणी जिल्ह्यातील आदर्श व मॉडेल शाळा म्हणून नावारूपास येईल, अशी चर्चा सध्या सर्वत्र होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या