महाराष्ट्रातील शिक्षकांच्या विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी मुंबईत आझाद मैदानावर शिक्षकांची प्रार्थना...!!
शिक्षकांच्या मागण्यांच्या परिपाठास राज्यातील हजारो शिक्षकांची उपस्थिती
प्रतिनिधी :- राज्यभरात केवळ शिक्षकांना टार्गेट करून टीईटी सक्तीमुळे सर्व शिक्षकामध्ये संतापाची लाट आहे. शासनाने मा.सर्वोच्च न्यायालयात पुनर्विलोकन याचिका दाखल करून टीईटी सक्ती मागे घ्यावी याचबरोबर नवीन अन्यायकारक संचमान्यता धोरण यामुळे हजारो शिक्षक अतिरिक्त होऊन मराठी शाळा बंद पडण्याचा मार्गावर आहेत,वीस हजार च्या वर शिक्षकांची पदे कमी होऊन सरकारी शाळा बंद होण्याच्या धोक्याची घंटा असल्याने पालक विद्यार्थी व शिक्षकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
यावर राज्यभर विविध ठिकाणी मोर्चा,धरणे आंदोलन सुरू आहे,मात्र सरकारने त्याकडे लक्ष दिले नाही.म्हणून महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक समितीच्या वतीने सोमवारी 08 डिसेंबर रोजी मुंबईत आझाद मैदानावर प्रार्थना करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस( देवाभाऊ) यांचे शिक्षकांच्या मागण्यांकडे लक्ष केंद्रित करण्यासाठी तीन तास धरणे अंदोलन व प्रार्थना करून मागण्यांचा परिपाठ वाचण्यात आला व मा मुख्यमंत्री यांना मागण्यांचे निवेदन देवून साकडे घातले आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा व शिक्षकांच्या समस्येवर तोडगा काढावा यासाठी आदर्श शिक्षक समितीच्या वतीने संस्थापक दिलीप ढाकणे,राज्य शिक्षक नेते अंकुश काळे,माधव लातुरे,दीपा देशपांडे,के. सी.गाडेकर,नितीन कोळी यांच्या उपस्थितीत आणि महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक समितीचे राज्याध्यक्ष प्रसाद पा.म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली आझाद मैदानावर परिपाठ घेण्यात आला,
यावेळी,छत्रपती संभाजीनगर,रायगड , सोलापूर,बुलढाणा, धाराशिव,नाशिक, सोलापूर,परभणी,बिड, जालना,पुणे, रत्नागिरी,गडचिरोली, जळगाव,धुळे, कोल्हापूर,सातारा सह राज्यभरातून हजारो शिक्षक बंधू भगीनीं यांनी दिवसभरात परिपाठाला सहभाग नोंदविला,परिपाठ प्रसंगी टीईटी,संच मान्यता जीआर रद्द करावा,जुनी पेन्शन लागू करा,वस्तीशाळा शिक्षकांची मूळ सेवा ग्राह्य धरा,माध्यमिक शिक्षकाचे प्रश्न सोडवा,राज्यभर रखडलेली विस्तार अधिकारी,केंद्रप्रमुख मुख्याध्यापक यांची पदोन्नती करण्यासाठी जिल्हा परिषदेला आदेश देण्यात यावे,सदोष बदली प्रकिया मध्ये राज्यभर झालेली बोगसगिरी, गैरव्यवहार,भ्रष्टाचार यांची उच्च स्तरीय चौकशी करून दोषींवर कारवाई करावी,शिक्षक व मुख्याध्यापक यांची विविध अॅप द्वारे व इतर आॅनलाईन ची सर्व कामे बंद करावी,शिक्षकांना मुलांना शाळेत टिकवून शिकवू द्या,बि.एल.ओ. सह व इतर सर्व अशैक्षणिक कामे बंद करा आशा विविध मागण्यांसाठी प्रार्थना करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.मुंबई येथे परिपाठला सर्व राज्य, विभाग,जिल्हा,तालुका पदाधिकारी,तसेच प्राथमिक,माध्यमिक आणि महीला आघाडी प्रमुख दिपा देशपांडे यांच्या सह सर्व जिल्हा व तालुका महिला पदाधिकारी,शिक्षिका व शिक्षक बंधू उपस्थित होते.परभणीतून जिल्हा अध्यक्ष संदीप गिरी, जिल्हा सरचिटणीस दत्तराव पोले,जिल्हा नेते केशवराव घूगे,राज्य* कार्यालयीन चिटणीस रामकिशन लटपटे,राज्य प्रसिद्धी प्रमुख श्री. माणिक नागरगोजे,श्री. तुकाराम मुंढे,दत्तात्रय परबत,
यांच्या सह शेकडो शिक्षक बंधू भगीनीं यांची व महाराष्ट्रातुन राज्य,विभाग,विविध जिल्ह्यातील व तालूका पदाधिकारी यांची उपस्थिती होती...परिपाठातील या मागण्यांसाठी शासन पुढे काय भुमिका घेणार कोणत्या मागण्या सोडविणार याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.




0 टिप्पण्या