पालम नगरपंचायत नविन मुख्याधिकारी साहेब यांच विविध प्रश्नासह हार्दिक स्वागत : ऑड.रामजी मनियार
कार्याचा शोध,स्मरण,व स्वागत
पालम प्रतिनिधी :- तत्कालीन मुख्याधिकारी संतोष लोमटे साहेब यांच्यानंतर पालम नगरपंचायत मध्ये मुख्याधिकारी पदावर आयाराम गयाराम कार्यक्रम सुरू आहे.काल नविन मुख्याधिकारी साहेब यांची नियुक्ती झाल्याचं कळालं त्यांच्या येण्यानं नगरपंचायत पालम प्रशासनाला शिस्त लागून पालम शहराच्या समस्या सुटतिल का?
१.२०२१ मध्ये नगरपंचायत पालम ची निवडणूक पार पडून नविन लोक सत्तेवर आले.आता नगरपंचायत निवडणुकिला अंदाजे १३ महिने बाकी आहेत.नविन मुख्याधिकारी व सत्ताधारी मिळून १५ कोटिची पाणीपुरवठा योजना सुरू करुन पालम शहराला खरे पाणी पाजवून पालम शहराची तान भागवतिल का ? नाहितर नगरपंचायत पालम सामान्यांना पाणी पाजण्यात पटाईत आहे!!
२.पाणीपुरवठा योजनेच्या नावावर खोदून ठेवलेले रस्ते दुरुस्त होतिल का?
३.पालम शहरातिल एकमेव पर्यटन स्थळ नावावर तलाव सुशोभीकरण विकास कामं पूर्ण होऊन बालउद्यान,वयस्कांसाठी फिरण्याची जागा,बसण्यासाठी खुर्च्या, पाण्यात फिरण्यासाठी नौका येतिल का ? नाहितर तलाव सुशोभीकरणाच्या नावावर वेड्या बाबळिची आलेली झाडं,सगळिकडून तलाव फुटून रस्त्यावर वहाणारं पाणी हिच परिस्थिती कायम राहील.यापेक्षा विकास काम करण्यापूर्वीचा तलावच चांगला होता.चहुबाजूंनी मोठमोठ्या मातिच्या तटबंदी होत्या, मोठ्या प्रमाणावर पाण्याची साठवणूक होत होती.त्यामूळं पाण्याची पातळी वाढत होती, पावसाळ्यात असं रस्त्यावर पाणी वाहत नव्हतं.तलाव सुशोभीकरणाच्या नावावर माति गायब झाली. झालेलं विकास काम उघड्या डोळ्यांनी पालम शहराची जणता बघत आहे.हे ३ कोटि ४७ लाख रूपयांच काम पूर्ण होऊन पालम शहराच्या जणतेला तलाव सुशोभीकरणाच्या नावावर पालम शहरात आणलेलं एकमेव पर्यटन स्थळ बघायला भेटेल का?
३.पालम शहरात सोलर ब्लब साठी ५ कोटि ८५ लाख रूपये आले.आमरण उपोषण करुन रामजी मणियार मेले तेंव्हा इतके भारी सोलर ब्लब नगरपंचायत पालमणे ( लावणार कोण) पालम शहराच्या जणतेला माहिती आहे.तेपण गायब झाले.त्या सोलर ब्लबची गुणवत्ता असि एखादी गाय,बैल,गाढव त्याला जाऊन अंग खाजवायला लागला तर सोलर ब्लब खाली पडून गायब. बरं कुठं थेट..........सेटच्या फार्म हाउस वर पालम शहर अंधारात.२०२९ पर्यंत संबंधित गुत्तेदार व नगरपंचायत पालम यांची पालम शहरातिल सर्वं सोलर ब्लब चालू अवस्थेत ठेवण्याची व सांभाळण्याची जबाबदारी आहे.नविन मुख्याधिकारी साहेब त्यावर कार्यवाही करुन पालम शहरात नव्याने सोलर ब्लब लावून पालम शहरात उजेड करतिल काय?
४.पालम शहरातले रस्ते आजपर्यंत खोदून न केल्यामूळं रस्त्यावर रस्ते करून बोगस रस्त्याची उंची वाढली ,त्या रस्त्यावर खड्डयात साचलेले पाणी त्यामूळं तिव्रतेने मिळणारी जमिनिची आर्थिंग या मूळं मोठा झटका, रस्त्याची वाढलेली उंची, लाईटच्या पोलची झुकलेली,खाली लोंबकळणारी लाईटची तार यामुळे कालच पालम शहरात अतिशय दुर्दैवी घटना घडून माझ्या जवळचा वर्गमित्र शवकतभाई सह २ लोकांचा मृत्यू झाला.व अन्य तिघेजन गंभीर जखमी झाले.नविन मुख्याधिकारी साहेब रस्त्याची विकास कामं खोदून करुन घेत,लाईट खात्याशी समन्वय साधून पालम शहरात ज्या ज्या ठिकाणी अशा लाईटच्या पोलची व वायरांची दूर अवस्था दूर करुन विजेचा शॉक लागून जिव जाणार घटना थांबवतिल का?
५.जून्या नगरपंचायत पालम चा यशिकडच्या बाजूचा कोपरा ढासळला सुदैवाने रस्त्यावर कोणी नव्हतं म्हणून जिवित हाणी टळली,ति धोकादायक बिल्डिंग कधिही ढासळू शकते एखाद्याचा त्यात जिव गेला त्याला नगरपंचायत प्रशासन जबाबदार राहिल,तसेच काल परवा मोठा रस्ता भागात एका जिर्ण बिल्डिंगची भिंत राहत्या घरावर पडली त्या व्यक्तिचं नूकसान झालं.नविन मुख्याधिकारी साहेब पालम शहरातल्या अशा जून्या सर्वं धोकादायक इमारती संबंधित लोकांना नोटीस काढून उतरुन घेण्याची कार्यवाही करतिल का ?
६.कायद्याने कुठलेही विकास कामे करत असतांना त्या कामाची माहिती देणार फलक ( पाटी) लावणे बंधनकारक आहे.आपली पालम नगरपंचायत त्याला अपवाद आहे.नगरपंचायत पालम, नगरपंचायत प्रशासन जिल्हाधिकारी कार्यालय परभणी व जिल्हाधिकारी साहेब परभणी यांना भेटून लिखित अर्ज दाखल केला.नविन मुख्याधिकारी विकास कामांचे फलक लावण्याचे आदेश देखिल का?
७.घनकचरा व्यवस्थापनाचे कोटिच्या घरात पैसे येतात परंतू घनकचरा नियोजनाचा बोजवारा वाजला आहे,२०२३ मध्ये चौकशी समिती आली तेंव्हा ताबरतोब घनकचरा प्रकल्पासाठी ताबरतोब जागा घेण्याचे लिखित आश्वासन दिले.त्याचा निधी उपलब्ध असलयाचे सांगितले पण घोडं कुठं आडलं ते कळालंच नाही.आडलेलं घोड सोडवून नविन मुख्याधिकारी साहेब घनकचरा प्रकल्प मार्गी लावत पालम शहरात सर्वं भागात घंटा गाड्या पाठवत, घंटा वाजवत घनकचरा जमा करून घनकचरा व्यवस्थापन करतिल का?
८.पालम शहरात सार्वजनिक स्वच्छता गृह केवळ नावाला आहेत.ति स्वच्छतागृह अस्वच्छतेची केंद्र बणली आहेत.नविन मुख्याधिकारी साहेब गायब स्वच्छता गृह शोधून,असलेली स्वच्छता गृह स्वच्छ करून घेण्याचं व शिस्त लावण्याचं काम करतिल का?
९.माझी वसुंधरा योजने अंतर्गत १ कोटी रूपयांचा निधी प्राप्त झाला पण त्याअंतर्गत पालम शहरात हरित क्रांती करत लावलेली झाडं व कामं एक रुपयाचा मळिक नसणार त्या माणसाला व सही करुन बिल काढणार त्या संबंधित इंजिनिअरलाच माहिती ती त्यांनाच दिसली.ति अदृश्य कागदावरची झाडं व कागदावरची कामं नविन मुख्याधिकारी साहेब पालम शहराच्या जणतेच्या डोळ्याला दिसतिल असि करुन घेतिल का?
१०.नगरपंचायत विकास कामांची चौकशी तात्काळ पूर्ण करुन घेण्यासाठी चौकशी समितिला सहकार्य करत चौकशी करून घेतिल का?
११.पालम शहरात विकास कामांच्या नावावर होणार भ्रष्टाचार थांबवतिल का ? काही लोक म्हणतात कुठं आहे भ्रष्टाचार मि रूपयाचा मळिक नाही त्यांनी वेळ मिळाला तर पहिल्या चौकशी समितिचा अहवाल निवांत वाचून व समजून घ्यावा ( समजला तर) भ्रष्टाचार १ रुपयाचा असो की भ्रष्टाचार १ कोटिचा भ्रष्टाचार भ्रष्टाचार असतो तो शिष्टाचार ठरत नाही हे कायदा व संधिधानात नमूद नविन मुख्याधिकारी साहेब झोपिचं सोंग घेवून मलिदा खाणार लोकांना समजावून सांगतिल का ?
१२.भारत देशात लोकशाही आहे आपलं पालम शहर भारतात आहे.म्हणजे पालम शहराला लोकशाही लागू होते इथं हुकुमशाही कोणालाही करता येणार नाही.आणि लोकशाही म्हणजे लोकांनी लोकांसाठी लोकांकडून चालवलेले राज्य असा होतो.म्हणजे लोकशाहित निवडून दिलेले लोक हे जणतेचे लोक सेवक व जणता मालक असते हे , स्वतःलाच मालक समजणार लोकसेवकांच्या लक्षात नविन मुख्याधिकारी साहेब आणून देतिल का?
१३.लोकशाहित संवैधाणिक पद्धतीने आंदोलन, आमरण उपोषण करण्याचा,सत्तेतिल लोकांना प्रश्न विचारण्याचा,त्यावर बोलण्याचा लिहिण्याचा प्रत्येक सामान्य माणसाला अधिकार आहे.त्याच्या या अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या अधिकारावर साम दाम दंड भेद अणिती याचा वापर करुन लोकशाहीत बंधणं आणता येत नसतात.हे नविन मुख्याधिकारी साहेब समजावून सांगतिल काय?
सगळी प्रश्न आहेत नविन मुख्याधिकारी साहेब आपल्या बोलण्यातून नव्हे प्रत्यक्ष कृतीतून उत्तर देतिल काय ?हाच गंभिर प्रश्न हाय ?
नविन मुख्याधिकारी साहेब यांचे नगरपंचायत पालम येथे सामाजिक कार्यकरता ऑड.रामजी मनियार हृदय पूर्वक स्वागत.


0 टिप्पण्या