गंगाखेड शैक्षणिक पॅटर्न तयार करावा. गटशिक्षणाधिकारी मुंढे यांच प्रतिपादन.
गंगाखेड तालूका गुणवत्तेत पुढे नेणार गट शिक्षणाधिकारी.जि प प्रा शा गोदावरी तांड्यास गटशिक्षणाधिकारी मा श्री मुंढे साहेब यांनी सदिच्छा भेटीवेळी मत व्यक्त केले
गंगाखेड प्रतिनिधी :- दि 15/07/2025 रोजी गटशिक्षणाधिकारी मा. श्री.शशिकांत मुंढे पंचायत समिती गंगाखेड यांनी जि.प.प्रा. शा.गोदावरी केंद्र मरडसगाव या शाळेस सकाळी 11:00 वाजता अचानक भेट दिली.शालेय परिसर व झाडे स्वच्छता व विद्यार्थी शिस्त पाहून सर्वांचे कौतुक केले. यावेळी सर्व शिक्षक वर्गावर अध्यापन करत होते..साहेबांनी सर्व वर्गावर भेट देवूनअनेक प्रश्न विचारले..विद्यार्थी प्रतिसाद पाहून समाधान व्यक्त करून इंग्रजी विषयी जास्तीचे लक्ष देण्याची सुचना यावेळी केली.
.तसेच शिक्षक,विद्यार्थी उपस्थिती पट पाहून सर्व आढावा घेतला व शाळेत सर्व विद्यार्थी यांना गणवेश,पुस्तक वाटप,बुट साॅक्स वाटप केल्या चे रेकॉर्ड पहाणी करून खात्री केले, काही महत्वपूर्ण रेकाॅर्ड शाळेवर जतन करावे बाबत व काही सुचना ही दिल्या..शाळेत विद्यार्थी यांना पोषणाहार चांगला भेटावा,विद्यार्थी यांना शाळेत पिण्याचे पाणि व शाळेतील स्वच्छता गृह दिवसभर खूले ठेवून त्याचा नियमित वापर करावा व स्वच्छता ठेवण्यासाठी व शालेय परिसरातील स्वच्छता सुंदर आहे या पुढे ही मा. मुख्यकार्यकारी अधिकारी जि.प. परभणी यांच्या आदेशानुसार पोषणाहार,शालेय परिसर,स्वच्छता गृह यांचा वापर व स्वच्छता या कडे विशेष लक्ष द्यावे.ते गरजेचे आहे असे बोलताना सांगून गंगाखेड तालूक्यातील सर्व शाळा व विद्यार्थी यांची गुणवत्ता समाधानकारक असुन ती नियमीत वाढवून आनखी पुढे नेवून जिल्हा भरात गंगाखेड शैक्षणिक पॅटर्न निर्माण करण्यासाठी सर्वांनी विशेष प्रयत्न करावेत अशा महत्त्वाच्या सुचना दिल्या आणि विशेष म्हणजे विद्यार्थी संख्या वाढीसाठी जानिवपुर्वक लक्ष देवून आता जि प शाळेत इयत्ता पहिली पासून सी.बी.एस.ई. पॅटर्न आधारीत अभ्यासक्रम सुरू झाला आहे.त्या मुळे पालक व विद्यार्थी यांचा कल जि. प.शाळा कडे वाढला आहे.म्हणून शाळांची पटसंख्या वाढविण्यासाठी सर्व मुख्याध्यापक,शिक्षक, व्यवस्थापन समीती व गावकरी यांनी लक्ष वाढवावे अशा ही सुचना मुख्याध्यापक व शिक्षक यांना दिल्या.या वेळी सर्व वर्गांना व स्वच्छता गृह,किचन खोली याची देखरेख करून खिचडी चांगली करावी, विद्यार्थी यांना शैक्षणिक पेट्या खुल्या ठेवून साहित्य हाताळण्यासाठी संधी देवून त्या विषयी मार्गदर्शन नियमीत करत रहावे.खिचडीत भाजीपाला वापर प्रमाणानुसार करावा,रोज मेनू नूसार खाऊ तयार करावा, स्वच्छता बाबत ही सक्त सुचना मा. गटशिक्षणाधिकारी श्री मुंढे साहेब यांनी सर्वाना दिल्या.
गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती गंगाखेड शशिकांत मुंढे यांच्या भेटी दरम्यान सोबत मरडसगाव केंद्राचे केंद्रप्रमुख श्री रावसाहेब चंदे साहेब हे उपस्थित होत्या ते यावेळी शाळा व व्यवस्थापन समीती तर्फे नुतन गटशिक्षणाधिकारी मा मुंढे साहेब हे पहिल्यांदाच शाळा भेटीस आल्याने त्यांचा पुष्पहार,शाल, श्रीफळ देवून तालूका गटशिक्षणाधिकारी साहेब श्री मुंढे व केंद्रप्रमुख श्री चंदे यांचा यथोचित स्वागत सत्कार करण्यात आला.. या सत्कार व भेटीवेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री.गणेश राठोड,श्रीअनिल राठोड, श्री राम आडे, मुख्याध्यापिका सौ केंद्रे एस.जी,शिक्षक श्री.माधव लातुरे,श्री नागनाथ गोरगीळे व विद्यार्थी मित्र उपस्थित होते.




0 टिप्पण्या