अखिल भारतीय ग्राहक पंचायत तालुका अध्यक्षपदी मोतीराम शिंदे, उपाध्यक्षपदी गोविंद सोलावाड

 अखिल भारतीय ग्राहक पंचायत तालुका  अध्यक्षपदी मोतीराम शिंदे, उपाध्यक्षपदी  गोविंद सोलावाड 


 पालम प्रतिनिधी :- अखिल भारतीय ग्राहक पंचायत या संघटनेची नविन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली  .या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गूलाबराव शिंदे प्रमुख पाहुणे सोपानराव टोले, मार्गदर्शक मधूकर राव मूळे, भगवान करंजे शेख गफार भाई आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते हा कार्यक्रम दिनांक 15जून रविवारी ममता विद्यालय पालम येथील संस्कृती गृहात दूपारी संपन्न झाला.

 मधूकरराव मूळे  मनोगत व्यक्त करताना म्हणाले. न्याय आणि हक्क राजरोसपणे पायदळी तुडविले जात आहेत. त्यामूळे सामान्या माणूस जेरीस आलेला आहे. त्यातच वाढत्या महागाईमुळे त्यांना जीवन जगणे अवघड होत चालले आहे. ग्राहकापर्यंत जीवनावश्यक वस्तू पोहचणेही दुरापस्त झाले आहे. शाळा, कॉलेजमध्ये मोठ्या प्रमाणावर देणग्या दिल्याशिवाय प्रवेश मिळेनासे झाले आहे. शासकीय योजनांना भ्रष्टाचाराची गळती लागल्याने नागरीकापर्यंत एक रुपयातील पंधरा पैसे जाईनासे झाले आहे.

भगवान करंजे म्हणाले जनसामान्य माणसाचे स्वातंत्र्य धोक्यात येते की काय ? अशी भिती निर्माण झाली आहे. ग्राहकाच्या हिताचे प्रश्न हाताशी घेवुन अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या माध्यमातून आपणासारखे ध्येयवादी कार्यकर्ते गेल्या अनेक वर्षापासुन कार्य करत आहेत. त्यामूळे समाजात लोकशिक्षण व लोकजागृतीचे कार्य वृध्दींगत होत आहे. यासाठी अखिल भारतीय ग्राहक पंचायत पाहिजे 

यावेळी पालम तालुका आखिल भारतीय ग्राहक पंचायत च्याअध्यक्षपदी मोतीराम शिंदे, उपाध्यक्ष  गोविंद सोलावाड तर सचिव अँड विठ्ठल खंदारे   सहसचिव  जे के देशमुख, महिला प्रमुख मूक्ताबाई माने, कोषाध्यक्ष प्रल्हाद पांचाळ,आय टि सेल प्रमुख राम गावंडे, पर्यावरण यांनी प्रमुख संभाजी शिराळे, प्रचार व प्रसिद्धी प्रमुख अंकूश वाघमारे यांची एक मताने निवड झाली.शहर अध्यक्ष धोंडीराम कळंबे, सचिव मारोतराव नाईकवाडे ,माधव बैकरे,आदि चु निवड केली.

कार्यक्रमाची प्रस्तावना मोतीराम शिंदे यांनी केली सूत्र संचलन गोविंद सोलेवाड यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी धोंडीराम कळंबे, एकनाथ दूधाटे, राम गावडे, गोविंद सोलावाड, रामराव शिंदे , कल्यान सिरस्कर  यांनी परिश्रम केले

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या