खळ मागाय गेली,अन् मळणी यंत्राची शिकार झाली,मळणी यंत्र मध्ये अडकून ३६ वर्षीय महिलेचा मृत्यू

 खळ मागाय गेली,अन् मळणी यंत्राची शिकार झाली,मळणी यंत्र मध्ये अडकून ३६ वर्षीय महिलेचा मृत्यू

 प्रतिनिधी मुनीर शाह बाजार सावंगी :- खुलताबाद तालुक्यातील पाडळी शिवारातील सोबलगाव येथील महीला बाजरी पिकाची मळणी करताना हवेमुळे मळणीयंत्रात साडीचा पधर ओढल्या जाऊन खळे (धान्य) मागायला गेलेल्या विवाहितेचा जागीच मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना सोमवारी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास पाडळी (ता. खुलताबाद) शिवारात घडली. वैशाली बालू मोटे (वय ३६, रा. सोबलगाव) असे मृत महिलेचे नाव आहे.


सोबलगाव येथील तुकाराम विठोबा बनसोड यांच्या पाडळी शिवारातील शेतात बाजरी काढणीचे काम सोमवारी शेखपूरवाडी येथील दिलीप सराटे यांच्या मळणीयंत्राद्वारे सुरू होते. या ठिकाणी पारंपरिक पद्धतीने पद्धतीने खळं (धान्य) मागायला वैशाली मोटे ही गरीब कुटुंबातील महिला गेली होती. सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास वैशाली या मळणीयंत्राच्या बाजूला उभ्या होत्या. दरम्यान अचानक आलेल्या वाऱ्यामुळे अंथरलेली ताडपत्री वैशाली यांच्या अंगावर येऊन मळणीयंत्राच्या पात्यात अडकली. यात वैशाली यासुद्धा ताडपत्रीसोबत मळणीयंत्रात ओढल्या गेल्या. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.


उपस्थित शेतकऱ्यांनी तत्काळ मळणीयंत्र बंद करून वैशाली यांना बाहेर काढले व बाजारसावंगी येथील आरोग्य केंद्रात दाखल केले. तेथील डॉक्टरांनी तपासून वैशाली यांना मृत घोषित केले.

अचानक वाऱ्यामुळे झाला घात.

शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. वैशाली यांच्या पश्चात पती, दोन मुले असा परिवार आहे. रात्री उशिरापर्यंत बाजारसावंगी पोलिस चौकीत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. अधिक तपास बाजार सावंगी पोलीस चौकीचे विनोद दिलीप बनसोड संजय सपकाळ संतोष भालेराव प्रकाश ठोकळ  हे करत आहेत

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या