ऋषीकेष सातपुतेचे NET परिक्षेत यश

 ऋषीकेष सातपुतेचे NET परिक्षेत यश



पालम प्रतिनिधी :- ममता विद्यालय पालम आणि माधवराव पाटील महाविद्यालय, पालम चा विद्यार्थी ऋषीकेश हरीष सातपुते हा युजीसी - सीएसआय आर तर्फे घेण्यात आलेल्या NET (वरीष्ठ महाविद्यालयीन प्राधापक पदासाठी) परीक्षेत देशात 32 वी रँक मिळवुन उत्तीर्ण झाला.


ऋषीकेश  सातपुते याने स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड येथे एम. एस्सी. बॉटनी (वनस्पतीशास्त्र) या विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. तसेच विद्यापीठातर्फे पीएच डी साठी घेण्यात आलेल्या PET परीक्षेत दोन वेळा यश संपादन केले.


त्याच्या या यशाबद्दल माधवराव पाटील महाविद्यालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला. या यशाबद्दल बळीराजा परिवार व मित्रपरिवारा कडून अभिनंदन करण्यात आले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या