श्रीयुत सन्माननीय रामराव फड व श्री दिलीप साळवे यांना सेवापुर्तीच्या निमित्ताने मनःपुर्वक हार्दिक शुभेच्छा.
गंगाखेड प्रतिनिधी :- दि ३१/०५/२०२५रोजी नियतवयोमानानुसार वयाच्या ५८व्या वर्षी आमचे सन्माननीय मित्र जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमीक शाळा अंबरवाडी येथील उच्च श्रेणी मुख्याध्यापक आदरणीय श्री फड रामराव ज्ञानोबा मुळ गाव हिंप्पळनेर ता चाकूर जिल्हा लातूर हल्ली मुक्काम गंगाखेड व आमचे परममित्र सन्माननीय श्री साळवे दिलीप कुसनाजी जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमीक शाळा इसाद मुळ गाव मु. पो. गंगाखेड जि परभणी हे ही आज दि ३१/०५/२०२५रोजी नियतवयोमानानुसार शासकीय सेवेतून सेवानिवृत्त झाले आहेत.
त्यांना त्यांच्या रहात्या घरी गंगाखेड येथे जाऊन दोन्ही गुरूजींना त्यांच्या धर्मपत्नी आर्धांगीनी सह शाल श्रीफळ,बुके, पेढे भरवून यथोचीत सत्कार करण्यात आला.. श्री रामराव फड हे अतिशय दिलखुलास व्यक्ती महत्त्वाचे मानकरी असून आपल्या सेवाकाळात प्रामाणिकपणे कार्य करून अनेक विद्यार्थी घडविले आदरणीय फड सर कोणाच्याही सुख दु:खात सहभागी होवून अगदी सकारात्मक मैत्री निभावनारे*गूरूजी म्हणून सर्व परिचित आहेत सरांना तीन मुले असून तीनही उच्च शिक्षण घेवून पुढील मार्ग क्रमण करीत आहेत. एक मूलगा एम बी बी एस एम डी, एक मुलगा एम बी बी एस आणि एक मुलगा उच्च शिक्षण घेवून पुढील शैक्षणिक वाटचाल करीत आहे.
तसेच आदरणीय श्री साळवे सरांना एक मुलगा एक मुलगी दोन अपत्य असून मुलगा बजाज कंपनीत औरंगाबाद येथे मेकॅनिकल इंजिनिअर म्हणून नोकरीस असून मुलगी उच्च शिक्षण घेत आहे असे दोन्ही सन्माननीय गुरूजींना सपत्नीक सत्कार केला तसेच त्यांचे आयुष्यातील उर्वरित आशा, आकांक्षा, स्वप्न, इच्छा पुर्ण होवोत, त्यांना उत्तम आरोप, आणि निरोगी उदंड आयुष्य लाभो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करून पुढील भावी आयुष्यासाठी आभाळभर शुभकामना देण्यात आल्या सत्कारमूर्ती दोन्ही गुरूजींना सपत्नीक सत्कार करताना श्री माधव लातुरे जि प प्रा शा गोदावरी तांडा , श्री माणिकराव नागरगोजे उच्च श्रेणी मुख्याध्यापक जि प प्रा शा झोला, श्री रामकिशन लटपटे उच्च श्रेणी मुख्याध्यापक इसाद, श्री तुकाराम मुंढे अध्यक्ष आदर्श शिक्षक समीती गंगाखेड,प्रदीप शिसोदिया आदर्श शिक्षकव इतर शिक्षक बांधव उपस्थित होते. प्रत्येक कर्मचारी हा एक वेळा सेवेतून नियतवयोमानानुसार सेवानिवृत्त होतच असतो. आपल्या सर्वांच्या गाठी भेटी या योगायोगानं झालेल्या असतात. प्रत्येकांना वाटतं की एवढी सेवा करून आपण आता सेवानिवृत्त होवून घरी जात आहोत कोनी तरी आपल्या कामाचे कौतुक करावं आपल्या ला कोणीतरी चांगलं म्हनावं, आपल्या पाठीवर कोणीतरी कौतुकाची थाप मारावी असे वाटते. प्रत्येकांनी कर्मचारी यांनी असा एक क्षण आपल्या जिवनात येवून आपण सेवा निवृत्त होणारच आहोत असे समजून त्यावेळी ही सर्व मंडळी, मित्र परिवार आपल्या सोबत राहतील व आपणही यावेळी त्यांच्या सोबत राहीले पाहिजे या उदात्त सकारात्मक विचाराने एकमेकांचा सहवास या पुढे ही सर्वांचा रहावा अशी अपेक्षा... पुन्हा एकदा दोन्ही गुरूजींना सेवानिवृत्तीच्या निमित्ताने मनःपुर्वक हार्दिक शुभेच्छा आणि पुढील वाटचालीसाठी खूप लाख लाख शुभकामना... धन्यवाद!!!



0 टिप्पण्या