जिल्हा माहिती कार्यालय परभणी कडून जनतेला सावधानतेचा ईशारा

 जिल्हा माहिती कार्यालय परभणी कडून जनतेला सावधानतेचा ईशारा

परभणी प्रतिनिधी :- भारतीय हवामान केंद्र कुलाबा मुंबई यांच्याकडून दिनांक 26/05/2025 रोजी मिळालेल्या ईमेलच्या संदर्भास अनुसरून,जिल्हाधिकारी तथा जिल्हाधिकारी कार्यालय परभणी,विभाग अपती व्यवस्थापन याच्या आदेशानुसार, जिल्हा माहिती अधिकार यानी परभणी जिल्ह्यातील सर्व जनतेस सावधानतेचा ईशारा दिला आहे,

भारतीय हवामान खाते,प्रादेशिक हवामान शास्त्र केंद्र मुंबई यानी दिलेल्या सूचनेनुसार, परभणी जिल्ह्य़ा करीता,दिनांक 26,27,28 व 29/05/2025 रोजी यलो आलर्ट असा ईशारा देण्यात आला असून, या दरम्यान जिल्ह्यात, वादळी वारे व विजेच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली अहे,त्या अनुषंगाने सर्व संबंधित यत्रना व जनतेने,या नैसर्गिक अपती बाबत खबरदारी घ्यावी असे,माननीय श्री रघुनाथ गावडे भापसे जिल्ह्याधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा अपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण परभणी,यानी पुर्व सूचना  व सावधानतेचा ईशारा दिला आहे,तरी अदेशाचे तथा सूचनेनुसार खबरदारी घ्यावी.


या कालावधीत परभणी जिल्ह्यात वादळी वारे व विजेच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली आहे. खबरदारीची उपाययोजना म्हणून खालील प्रमाणे काळजी घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी केले आहे.


या गोष्टी करा : विजेच्या गडगडाटासह पावसाची पूर्वकल्पना असल्यास बाहेर जाणे टाळा. आकाशात विजा चमकत असल्यास घरात किंवा सुरक्षित इमारतीत आश्रय घ्या. घराच्या बाल्कनी, छत अथवा घराबाहेरील ओट्यावर थांबू नका. घरात असाल आणि घरातील विद्युत उपकरणे चालू असतील तर त्या वस्तू त्वरित बंद करा. तारांचे कुंपण, विजेचे खांब व इतर लोखंडी वस्तूंपासून दूर रहा. पाण्यात उभे असाल तर तात्काळ पाण्यातून बाहेर पडा. तसेच नागरिकांनी आपले शेतमाल व पशुधन वेळेतच सुरक्षित स्थळी ठेवावे.


या गोष्टी करु नका : आकाशात विजा चमकत असल्यास घरातील लँडलाईन फोनचा वापर करू नका. शॉवरखाली अंघोळ करू नका. घरातील बेसिनचे नळ, पाण्याची पाईपलाइन यांना स्पर्श करू नका तसेच कुठल्याही विद्युत उपकरणांचा वापर करू नका. विजेच्या गडगडाटासह वादळी वारे चालू असताना लोखंडी धातूच्या सहाय्याने उभारलेल्या तंबूमध्ये किंवा शेडमध्ये आसरा घेऊ नका. उंच झाडाच्या खाली आसरा घेऊ नका. धातूंच्या उंच मनोऱ्याजवळ उभे टाकू नका. जर आपण घरात असाल तर उघड्या दारातून अथवा खिडकीतून वीज पडताना पाहू नका. हे बाहेर थांबण्याइतकेच धोकादायक आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या