पालम गटशिक्षणाधिकारी पदी श्री सुभाषराव आमले रूजू.

 पालम गटशिक्षणाधिकारी पदी श्री सुभाषराव आमले रूजू.

पालम प्रतीनिधी :- पालम पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी तथा जेष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी पंचायत समिती पालम श्री शिवाजीराव गायकवाड ३० एप्रील रोजी सेवानिवृत्त झाल्या पासून पालम तालूक्यास १३ मे पर्यत गटशिक्षणाधिकारी पद रिक्त होते,

 गटशिक्षणाधिकारी पालम पदाचा अतिरिक्त पदभार जेष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी जिल्हा परिषद परभणी यांना दिल्याने पालम तालूक्यास एक कार्यतत्पर जिंतूर व परभणी येथे गटशिक्षणाधिकारी पदाचा पदभार घेवून आदर्श काम केलेले मा श्री आमले यांना गटशिक्षणाधिकारी पालम चा अतिरिक्त पदभार दिल्याने पालम तालुक्यातील शिक्षक व शैक्षणिक क्षेत्रात आनंदाचे वातावरण पसरले आहे.. श्री सुभाषराव आमले हे दि१५/०५/२०२५ रोजी गटसाधन केंद्र पालम येथे हजर  झाले तेव्हा गटसाधन केंद्रातील सर्व साधन व्यक्ती, विषय शिक्षक व शिक्षक वृंद यांच्या वतीने त्याचा शाल, श्रीफळ, पुष्पहार घालून स्वागत करताना यावेळी केंद्रप्रमुख सुभाष चव्हाण,श्री उडतेवार, मुख्याध्यापक साहेबराव राठोड,विषय तज्ञ शिक्षक, साधन व्यक्ती श्री तत्तापुरे, श्री सचिन बरूरे, श्री मद्देवाड, श्री गित्ते, श्री हराळ व इतर गटसाधन केंद्रातील सर्व स्टाफ व केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक व शिक्षक वृंद उपस्थित होते.* 

     *श्री सुभाषराव आमले हे एक कार्यतत्पर, कर्तव्यदक्ष गटशिक्षणाधिकारी म्हणून पालम पंचायत समितीस लाभल्याने तालूक्यातील शिक्षक बदल्या, अकरावी नुतन प्रवेश, शाळा नुतन प्रवेश, विविध शैक्षणिक सरकारी योजना विद्यार्थी, शिक्षक, पालक व शाळा, आणि शैक्षणिक अडीअडचणी सोडविण्यासाठी श्री सुभाषराव आमले हे नक्किच सकारात्मक, सहकार्याची भुमिका घेवून सर्व प्रश्न सोडविण्या साठी आदर्श काम करतील अशा भावना शिक्षण विभाग पालम व शिक्षक बांधव पालम यांच्यातून चर्चा अंती उमटत आहेत श्री सुभाषराव आमले यांच्या गटशिक्षणाधिकारी पालम पदी विराजमान झाल्याने सर्वत्र त्यांचे अभिनंदन करून पुढील कार्यास शुभेच्छा देवून शुभकामना व्यक्त केल्या जात आहेत*

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या