ममता विद्यालय पालम येथील एसएससी बोर्ड परीक्षेचा 93% निकाल.

 ममता विद्यालय पालम येथील एसएससी बोर्ड परीक्षेचा 93% निकाल.



पालम प्रतिनिधी :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्या वतीने आयोजित शालांत प्रमाणपत्र परीक्षा मार्च 2025 चा निकाल नुकताच जाहीर झाला. त्यामध्ये श्री बळीराजा शिक्षण संस्था, पालम संचलित ममता विद्यालयाने निकालाची उज्वल परंपरा कायम ठेवत शाळेचा सरासरी निकाल.93%  टक्के लागला असून यामध्ये 272त्यापैकी 253 विद्यार्थी एसएससी बोर्ड परीक्षेसाठी प्रविष्ट झाले होते. 

 यामध्ये 90% पेक्षा जास्त 34 विद्यार्थी आणि 75% पेक्षा जास्त 85 विद्यार्थी, प्रथम श्रेणीत 76 विद्यार्थी आणि सरासरी पास 58 विद्यार्थी पास झाले . विद्यालयातून प्रथम क्रमांक कुमारी पौळ निशिगंधा गजानन 100% व्दितीय क्रमांक ठाकूर विनोद मारुती 98 % आणि तर तृतीय  क्रमांक हरवले निवृत्ती शिवाजी 97.60%  मिळवला आहे उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे  श्री बळीराजा शिक्षण संस्थेचे संस्थापक, संचालक भाई श्री लक्ष्मणराव गोळेगावकर, सचिव  डॉ  स गो येलमोटे,संस्थाध्यक्ष मा. श्री तुषार भैय्या गोळेगावकर,  ज्येष्ठ संचालिका श्रीमती चित्राताई गोळेगावकर, संचालिका सौ. अक्षयताई गोळेगावकर, प्रशासकीय अधिकारी मा. श्री गिरीश भैय्या सोळंके, प्राचार्य,  मा.शिवाजी अंबोरे , उपप्राचार्य रामचंद्र  दूधाटे पर्यवेक्षक भरत आचार्य ,परीक्षा विभाग प्रमुख प्रकाश आनकाडे, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक यांनी  अभिनंदन करून पुढील यशस्वी वाटचालीसाठी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या