शाळांची गुणवत्ता वाढवून इयत्ता पहीली चे प्रवेश वाढवा... गटशिक्षणाधिकारी भगवानराव ठुले.
गंगाखेड प्रतिनिधी :- मरडसगाव येथे केंद्रीय शिक्षण परिषद उत्साहात संपन्न. दिनांक 8 एप्रिल 2025 रोजी जि .प. के .प्रा .शा. मरडसगाव येथे सकाळी ७:००ते ११:१५या वेळेत उत्कृष्ट शिक्षण परिषद संपन्न झाली.
या शिक्षण परिषदेस शेवटी मा गटशिक्षणाधिकारी भगवानराव ठुले साहेब यांनी सदिच्छा भेट देवून मरडसगाव केंद्रातील सर्व शाळांचा शैक्षणिक प्रगती आहवाल व शासन व प्रशासन यांच्या सर्व सुचना, परिपत्रके, सर्व योजना सर्व शाळांपर्यंत पोहचतात की नाही याबाबत माहिती घेतली... व सर्वांना मार्गदर्शन करताना गंगाखेड तालुक्यातील सर्व शिक्षक, मुख्याध्यापक व संबंधित शाळा व्यवस्थापन समीती यांनी आपापल्या शाळांची विद्यार्थी संख्या वाढवून सर्व विद्यार्थी गुणवत्ता संपन्न करावेत व सर्व शिक्षक बंधू भगीनीं यांनी आपल्या ला नेमून दिलेली सर्व कामे सकारात्मक विचाराने अगदी चोखपणे पार पाडावीत असे आपल्या भाषणात बोलताना आवाहन केले.या वेळी शिक्षण विस्तार अधिकारी श्री वसंत फुटके,केंद्रप्रमुख श्री चंदे सर, केंद्रीय मुख्याध्यापक श्री नानजकर सर, मरडसगाव केंद्रातील शिक्षक बंधू भगीनी उपस्थित होते*
*या शिक्षण परिषदेत सुरूवातीस सकाळी प्रास्ताविक मार्गदर्शन केंद्रप्रमुख श्री चंदेसाहेब यांनी केले ,केंद्रीय शाळेचे मुख्याध्यापक श्री नानजकर साहेब यांनी ही नवीन उपक्रमांची माहिती दिली व प्रत्येक केंद्रस्तरीय संमेलन हे केंद्रितील प्रत्येक वेळी वेगवेगळ्या शाळेवर झाले पाहिजे असे मत मांडले व त्याचे फायदे सांगून सविस्तर मार्गदर्शन केले.*
*श्री कोकणे सर तज्ञ साधन व्यक्ती यांची सुंदर अशी तासीका घेऊन शिक्षकांना शालेय गुणवत्ता आधारित स्वलिखीत गीताचे उत्तम सादरीकरण केले*.
*तसेच दुसरी तासिका श्री कुंडगीर सर यांनी सर्व शैक्षणिक माहीती यावर मार्गदर्शन करत सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन यावर सविस्तर विषय विवेचन केले*
*सर्व शाळांचे मुख्याध्यापक व शिक्षकांनी निपून भारत व विविध उपक्रम यांचे व शाळेवरील येत असलेल्या विविध अडचणी या बाबत मनोगते सादर करून शासन व प्रशासन यांच्या सर्व आदेश व सुचना नुसार या अंतर्गत काम करत असलेल्या सर्व कामांचा आढावा सादर केला*
*सन्माननीय विस्तार अधिकारी श्री वसंत फुटके साहेब यांनी तालूक्यातील शाळांचा शैक्षणिक आढावा मांडून शासनाच्या विविध उपक्रम व आदेश यांचे विषयी सविस्तर मार्गदर्शन केले.*
*श्री माधव लातुरे यांनी आपले शैक्षणिक मनोगत व्यक्त करून आदरणीय भगवानराव ठुले साहेब यांचे कडे गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती गंगाखेड व आदरणीय वसंत फुटके यांचे कडे शिक्षण विस्तार अधिकारी गंगाखेड चा पदभार आल्या पासून गंगाखेड तालुक्यातील शाळा व विद्यार्थी यांच्यात एक आनंदाची वातावरण तयार होवून सर्व शिक्षक वृंद गुणवत्ता विकास यासाठी पुर्ण वेळ काम करून सर्व विद्यार्थी गुणवत्ता संपन्न होत आहेत. यावेळी श्री ठुले साहेब येत्या जुन मध्ये तर श्री फुटके साहेब येत्या मे महीण्यात सेवानिवृत्त होत आहेत यावेळी दोन्ही कर्तव्यदक्ष अधिकारी यांच्या कार्याचा गौरव करून त्यांचा मरडसगाव केंद्रातील सर्व शिक्षक बंधू भगीनींच्या वतीने सेवानिवृत्ती निमित्ताने आदरपूर्वक सत्कार करून त्यांच्या चालू कार्यास व भावी आयुष्यासाठी अॅडव्हान्स शुभेच्छा देवून सोबतच ३०एप्रील ला सेवानिवृत्त होत असलेले श्री जाधव सर जिप प्रा शा ढवळकेवाडी*यांना ही सर्वांच्या वतीने सत्कार करून पुढील वाटचालीसाठी शुभकामना देण्यात आल्या.*
*या शिक्षण परिषदेचे सूत्रसंचालन श्री किरडे सर यांनी केले तर सर्वांचे आभार श्री कुंडगीर सर यांनी मानले अशाप्रकारे उत्कृष्ट अशी केंद्र स्तरीय शिक्षण परिषद जि.प. के. प्रा.शा. मरडसगाव येथे केंद्रप्रमुख श्री चंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली, व केंद्रीय मुख्याध्यापक श्री नानजकर साहेब यांच्या नियंत्रणाखाली, मा गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती गंगाखेड श्री ठुले साहेब व शिक्षण विस्तार अधिकारी श्री फुटके साहेब यांच्या उपस्थितीत मरडसगाव येथील शिक्षक व शिक्षक भगिनी यांनी घेतलेल्या परिश्रमाने. केंद्रातील सर्व शिक्षक व शिक्षक भगिनी यांच्या सहकार्याने,मोठ्या संख्येने उपस्थित राहून, येथील शिक्षण परिषद यशस्वीरित्या, उत्कृष्टपणे संपन्न झाली*
🙏*
---------------------------------------------------



0 टिप्पण्या