उल्लेखनीय कार्याबद्दल जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते ग्रामसेवक सुसूर्यवंशी गौरव.
पालम प्रतिनिधी : सेवा हक्क हमी कायदा अंतर्गत शंभर टक्के योगदान देऊन उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल
जिल्हाधिकारी गावडे यांच्या हस्ते पालम तालुक्यातील पेठशिवणी येथील ग्रामसेविका संजीवनी सूर्यवंशी यांना
प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला.
मंगळवारी पालम पंचायत समिती देखील कार्यक्रम घेऊन सूर्यवंशी यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी विस्तार अधिकारी बी. आर. उकंडे, शंकर टाले, गितांजली भिमनपलेवार, चंदा गुरव, अरुण महाजन, ग्रामपंचायत अधिकारी राजकमार हिंगे, अर्जुन डिगोळे, साईनाथ चिलगर, सरपंच शिवाजी वाडेवाले, बबनराव कवडे, ज्ञानोबा वाघमारे, उपसरपंच सुधाकर हानवते आदी उपस्थित होते.


0 टिप्पण्या