गटशिक्षणाधिकारी श्री शिवाजीराव गायकवाड सेवानिवृत्ती निमित्त सेवापुर्ती व कृतज्ञता सोहळा संपन्न
पालम प्रतिनिधी :- दि.३०एप्रील रोजी दुपारी ११:००ते ३:००वाजता पालम पंचायत समिती चे कर्तव्यदक्ष, सर्व समावेशक, तालूक्याची शैक्षणिक प्रगती कशी होईल या साठी आहोरात्र प्रयत्नशिल रहाणारे गटशिक्षणाधिकारी तथा जेष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी पंचायत समिती पालम चे मा श्री शिवाजीराव सायबू गायकवाड साहेब सेवानिवृत्त होत असल्याने
त्यांची शिक्षण विभाग पालम, सर्व केंद्रप्रमुख मुख्याध्यापक, शिक्षक बंधू भगीनींच्या व मित्रपरिवार यांचे वतीने त्यांचा यथोचित जाहीर सत्कार करून त्यांच्या पुढील भावी आयुष्यासाठी सर्वांच्या वतीने या पालम तालुक्यातील कर्तव्यदक्ष भुमीपुत्रास शुभेच्छा, शुभकामना देण्यात आल्या. या करीता गटसाधन केंद्र पालम येथे दि ३०एप्रील २०२५रोजी सकाळी ११:००वाजता हा सोहळा तालूक्यातील केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक, सर्व शिक्षक बांधव यांचे वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते .या कार्यक्रमास पालम तालुक्यातील सर्व शैक्षणिक क्षेत्रातील मित्रपरिवार अधिकारी पदाधिकारी यांनी उपस्थित राहून शुभेच्छांचा वर्षाव केला. आयोजन समिती गटसाधन केंद्र पालम, सर्व केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक यांचे वतीने करण्यात हा सेवानिवृत्ती व कृतज्ञता सोहळा आयोजित केला होता*
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान शिक्षण विस्तार अधिकारी जिल्हा परिषद परभणी यांनी भुषवले तर प्रमुख पाहुणे म्हणून गंगाखेड चे माजी गटशिक्षणाधिकारी श्री रावसाहेब कातकडे, सामाजिक कार्यकर्ते तथा जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचे संचालक श्री नारायणराव शिंदे मामा, सेवानिवृत्त केंद्रप्रमुख श्री प्रकाश कोकाटे, पेठशिवनी हायस्कूल चे मुख्याध्यापक श्री धिवर सर, केंद्रप्रमुख श्री स्वामी एस एन हे होते. यावेळी सत्कार मुर्ती मा श्री शिवाजीराव गायकवाड यांना निरोप देताना श्री माधव लातुरे राज्य नेते महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक समिती श्री गित्ते सर, श्री हाके सर श्री गायकवाड यांचे विद्यार्थी श्री राजकुमार बैकरे, सामाजिक कार्यकर्ते व जिल्हा बॅंकेचे माजी संचालक नारायणराव शिंदे मामा यांनी कौतुकपर आपली मनोगते व्यक्त केली.
तसेच या भावनीक कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री प्रकाश कोकाटे, श्री रावसाहेब कातकडे, श्री एस एन स्वामी यांनी श्री गायकवाड शिवाजीराव यांच्या कार्याचे कौतुक करून अभिनंदन केले व आपले मनोगते सादर केली.यानंतर मा श्री शिवाजी गायकवाड गटशिक्षणाधिकारी तथा जेष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी पंचायत समिती पालम यांचा गटसाधन केंद्र पालम, सर्व केंद्रप्रमुख, सर्व मुख्याध्यापक सर्व शिक्षक वृंद तालुका पालम यांचे वतीने व बाहेरून आलेले श्री गायकवाड यांचे वर प्रेम करणारे, सर्व मित्र परिवार, विद्यार्थी, नाव्हा येथील जन्म भुमीतील आलेले गावकरी, यांनी शाल, श्रीफळ, बुके, भेटवस्तू, कपडे देवून यथोचित सत्कार केले.
कार्यक्रम च्या शेवटी सेवानिवृत्त होत असलेले मा श्री शिवाजीराव गायकवाड यांनी सत्काराला उत्तर देताना आपले भावनीक मनोगत मांडून* *आयुष्यातील आठवनींना उजाळा दिला. मी मला नेमून दिलेले कामे आजपर्यंत आत्मविश्वासाने व सकारात्मक दृष्टिकोन समोर ठेवून मी कसलाही मोह समोर येवू न देता केले त्या मुळेच हा दिवस आनंदाचा मी पहात आहे सर्वांनी असेच कार्य करावे नक्कीच सर्वांचा शेवटचा दिवस गोड होईल. शेवटी सर्वांनी माझेवर खुप प्रेम केले मला सहकार्य केले या मुळेच ही अवघड कामे मी आज पर्यंत करू शकलो असे मनोगत व्यक्त करून मा हा सेवापुर्ती चा व कृतज्ञता सोहळा आयोजन करण्या कामी गटसाधन केंद्र टिम, सर्व केंद्रप्रमुख, सर्व* *मुख्याध्यापक यांनी व मित्रपरिवार यांनी खुप खुप मेहनत घेवून हा कार्यक्रम घडवून आनला व माझा सपत्नीक जाहीर मोठा सत्कार केला या बद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार आपले नाते असेच प्रेमाचे मरेपर्यंत राहील अशी अशा परमेश्वराला मांडून मनोगताला पुर्णविराम दिला.
शेवटी अध्यक्षीय समारोप श्री ब्याळे टी टी यांनी आपल्या भाषणातून केले या कार्यक्रमाचे बहारदार व उत्कृष्ट सुत्रसंचालन श्री श्री पत्की सर यांनी केले तर या कार्यक्रमाला सेवानिवृत्त शिक्षक/केंद्रप्रमुख , पदवीधर शिक्षक, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक, विस्तार अधिकारी, शिक्षक बंधू भगीनीं, मित्रपरिवार असे शेकडो गुरूजन व मित्रगण हजर होते



0 टिप्पण्या