भारतीय जनता पार्टीचे प्रदेश चिटणीस देविदास भाऊ राठोड यांचे गंगाखेड येथे स्वागत व सत्कार तसेच संघटनात्मक आढावा
गंगाखेड प्रतिनिधी :- भारतीय जनता पार्टीचे प्रदेश चिटणीस तथा संस्थापक अध्यक्ष बंजारा क्रांती दल महाराष्ट्र,सामाजिक,राजकीय कार्यात सतत सक्रिय असणारे देविदास भाऊ राठोड हे छत्रपती संभाजीनगरकडे जात असताना गंगाखेड येथील कार्यकर्त्यांनी भेट घेतली.
आणी भाजपा गंगाखेडच्या वतीने व भाजपा तालुका महामंत्री आर,डी,भोसले,आनंदवन विद्यालयाचे संचालक प्रा,राजेश राठोड सर यांच्या वतीने स्वागत केले.गंगाखेड येथे या वेळी संघटनात्मक कामा विषयी चर्चा झाली.भविष्यात आपणास पार्टीने अजून मोठी जबाबदारी देऊन न्याय द्यावा!अशी भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.या प्रसंगी धर्मजागरणचे बंडू महाराज,सोनेराव महाराज,भाजपा तांडा वस्ती संपर्क अभियानाचे प्रदेश सहसंयोजक दशरथ राठोड,माजी नगरसेवक गौतम रोहिणीकर,प्राध्यापक निलकांत जाधव,अंबादास राठोड,सोनपेठ किसान मोर्चा तालुका अध्यक्ष भगवान चव्हाण,किसान संघाचे गंगाखेड तालुका अध्यक्ष माधव चव्हाण,लहू राठोड,गणेश राठोड सर,अंबादास चव्हाण,बालासाहेब राठोड,राजू चव्हाण आदी जण उपस्थित होते.



0 टिप्पण्या