आदर्श माता इंद्रायणी गोशाळा गंगाखेड येथील रोड,गोमातेचा हिंदू रिवाजाप्रमाणे अंत्यसंस्कार,आदर्श सत्कार्य.

 आदर्श माता इंद्रायणी गोशाळा गंगाखेड येथील रोड,गोमातेचा हिंदू रिवाजाप्रमाणे अंत्यसंस्कार,आदर्श सत्कार्य. 



परभणी प्रतीनिधी :- राजमाता गोमाता  मृत्यूनंतर पडलेली गायीचेअंत्यविधी हा माणसाच्या सारखा  धार्मिक चांगल्या पद्धतीचा करा असे राष्ट्रीय गौसेवक नितीन जाधव गोगलगावकर प्रतिपादन केले.

 माता इंद्रायणी गोशाळेतील गोसेवकांचा सर्व गोशाळेतील संचालकांनी आदर्श घ्यावा असे सत्कार्य केले,गोशाळेतील गाय मृत्युमुखी पडली असता,खड्डा खोदून अंत्यविधी केला,असेच सर्व गोसेवकांनी व गोशाळेतील सर्वांनी कोणत्याही ठिकाणी जर,आपली गाय मृत्युमुखी पडली असेल किंवा मरण पावली असेल तर शेतकरी असो किंवा कोणी असो सर्वांनी शेतकरी बांधवानीही, किंवा पशुसंवर्धन विभाग असो,मृत्यूनंतर गोमातेला उघड्यावर न टाकता आपण आपल्या क्षेत्रात परिसरामध्ये राजमाता म्हणजे गोमातेचा हिंदू रितीरिवाजानुसार अंत्यविधी चांगल्या पद्धतीने करावा,हळद,कुंकू,मीठ,अगरबत्ती,दिवा लावून, पूजा अर्चा करून गोमातेला जय घोष करत व गोमातेचे नामस्मरण करत अंत्यसंस्कार करावा,   आदर्श माता इंद्रायणी गोशाळा गंगाखेड रोड या गोशाळेचा सर्व जिल्ह्यातील व महाराष्ट्रातील सर्वांनी आदर्श घ्यावा,गौरक्षक सेना परभणीचे जिल्हाध्यक्ष राष्ट्रीय गोसेवक नितीन जाधव गोगलगावकर यांनी, स्वतः पाहणी करून व गाईची अंत्यविधी करण्यातची सेवा करण्यात आली,याप्रसंगी माता इंद्रायणी गोशाळेचे संचालक दत्ता पहारे,जेसीबी चालक दत्ता दुधाटे, इंद्रायणी माता गोशाळा सर्व गोपालक व गोसेवक गुरखी तसेच आजूबाजूचे शेतकरी बांधव उपस्थित होते अशी माहिती राष्ट्रीय गौसेवक नितीन जाधव गोगलगावकर यांनी पत्रकाद्वारे दिली

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या