उकडगाव जहांगीर जिल्हा परिषद शाळेत माता पालक मेळावा व हळदीकुंकू कार्यक्रम संपन्न.

 उकडगाव जहांगीर जिल्हा परिषद शाळेत माता पालक मेळावा व हळदीकुंकू कार्यक्रम संपन्न.


पालम वार्ताहर :- तालुक्यातील ऊकडगाव (ज.) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत माता पालक मेळावा व हळदीकुंकवाचा कार्यक्रम दिनांक 30 जानेवारी रोजी आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून शाळेचे मुख्याध्यापक ए.के.देवळे तर प्रमुख पाहुणे म्हणून मिनाबाई हाके, मनीषा शिंदे, ग्रामसेवक श्रीमती फड यांची उपस्थिती होती कार्यक्रमाचे उद्घाटन शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष यांच्या हस्ते करण्यात आले माता पालक मेळावा व हळदी कुंकवाच्या कार्यक्रमामध्ये विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेमध्ये उखाणे स्पर्धा ज्यामध्ये 65 माता पालकांनी आपला सहभाग नोंदवला या स्पर्धेमध्ये प्रथम सोनाली दुधाटे, द्वितीय प्रभावती शिंदे, तृतीय सुवर्ना दुधाटे आल्या तर संगीत खुर्ची स्पर्धेमध्ये 50 मातांनी सहभाग नोंदवला प्रथम गायत्री शिंदे, द्वितीय रणीता शिंदे, तृतीय राणी शिंदे, चतुर्थ छाया गायकवाड, पंचम अनिता शिंदे यांनी अनुक्रमे क्रमांक पटकावला या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक देवळे यांनी केले तर सूत्रसंचालन मीराताई शिंदे यांनी केले स्पर्धेचे नियोजन सरिता जाधव यांनी केले तर आभार रणीता शिंदे यांनी मानले कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेचे शिक्षक तिरकमटे, पांचाळ, स्वामी, सय्यद यांच्यासह कौशल्याबाई शिंदे, पोलीस पाटील दत्ता झिलमे, प्रभाकर शिंदे, दत्ता परतवाड यांनी परिश्रम घेतले

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या