पालम शहरात स्टेट बँक ऑफ इंडियाचे गंगाखेड रोडवरील एटीएम फोडले.

 पालम शहरात स्टेट बँक ऑफ इंडियाचे गंगाखेड रोडवरील एटीएम फोडले.  



पालम प्रतिनिधी :- पालम गंगाखेड रोडवरील शिवनेरी कॉलेज जवळ असलेले एस.बी.आय चे एटीएम अज्ञात चोरट्यांनी गॅस कटरच्या साह्याने तोडून आतील रक्कम लंपास केली आहे. या घटनेने पालम शहरात खळबळ माजली आहे 

या घटनेचे वृत्त कळताच पालम पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुरेश थोरात यांनी आपली सर्व टीम सोबत घेऊन घटनास्थळी भेट देत पाहणी केली व वरिष्ठांना याबाबतीत कळविले असता परभणीचे पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी ,अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे व उपविभागीय पोलिस अधिकारी समाधान पाटील स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक विवेकानंद पाटील, यांनी पाहणी केली

या घटनेच्या अनुषंगाने योग्य तो तपास करण्याच्या बाबतीत वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सूचना देण्यात आल्या आहेत सदरील ए.टी.एम. फोडण्या अगोदर चोरट्यांनी प्रवेशद्वारा जवळील सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर काळ्या कलर चा स्प्रे मारल्याचे निदर्शनात आढळून आले.

दरम्यान एटीएम फोडण्याच्या एक दिवस अगोदर एटीएम मध्ये 25 लाख रुपयांची कॅश भरण्यात आली होती अशी विश्वासनीय माहिती बँकेच्या कर्मचाऱ्यांकडून देण्यात आली परंतु चोरट्यांनी किती रकमेवर डल्ला मारला याची पूर्ण माहिती मिळू शकली नाही, याचा तपास चालू आहे.

 वृत्तलिहीपर्यंत पालम पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू होती.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या