दर्पण दिनाचे औचित्य साधून पालम,शेतकऱ्यांवर रूमणचा अंक देऊन पत्रकारांचा सत्कार.

 दर्पण दिनाचे औचित्य साधून पालम,शेतकऱ्यांच रूमणचा अंक देऊन पत्रकारांचा सत्कार. 



पालम प्रतिनिधी :- पालम तालुक्यातील ममता विद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष राष्ट्रीय रत्न, माननीय भाई लक्ष्मणराव गोळेगावकर कार्यक्रमाचे   अध्यक्ष यांच्या हस्ते दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला,



व दर्पण दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात पालम तालुक्यातील सर्व पत्रकार बांधवाना, भाई तुषार भाऊ गोळेगावकर यांच्या हस्ते, शेतकऱ्यांच रूमण पुस्तकाचा अंक देऊन, पत्रकारांचा सत्कार करण्यात आला.यावेळी आदरणीय भाई लक्ष्मणराव गोळेगावकर नाना यांनी, पत्रकार व पत्रकारीता म्हणजेच सामाजिक,राजकीय,शैक्षणिक संतुलन व सचोटीवर अंकुश ठेवून, पारदर्शी बनवणार शस्त्र आहे,त्याचा योग्य वेळी योग्य वापर करून,पत्रकारांनी आपल अस्तित्व व प्रभुत्व टिकवून ठेवाव,असे आव्हानात्मक उद्गार काढले,


तसेच शेतकऱ्यांवर व मजूर यांच्यावर होणारा अन्याय बद्दल जास्तीत जास्त लिहून, शासनाला दर्पण दाखवण्यात सत्कार्य करावं असेही व्यक्त केले.

यावेळी संस्थापक अध्यक्ष तथा राष्ट्रीय रत्न माननीय भाई लक्ष्मणराव गोळेगावकर, भाई तुषार भाऊ गोळेगावकर, शाळेतील शिक्षक वृंद व सर्व पत्रकार बांधव उपस्थित होते.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या