बोडखा येथील मोडकळीस आलेल्या शाळेला जिर्णोद्धारासाठी शिक्षण मंत्री दादा भुसे कडे अक्रम पटेल यांनी केली मागणी.

 बोडखा येथील मोडकळीस आलेल्या शाळेला जिर्णोद्धारासाठी शिक्षण मंत्री दादा भुसे कडे अक्रम पटेल यांनी केली मागणी. 



प्रतिनिधी मुनीर शाह बाजार सावंगी :-  खुलताबाद तालुक्यातील मौजे बोडखा येथील जिल्हा परिषद शाळा मोडकळीस आली असुन नवीन शाळा खोल्यांसाठी निधी उपलब्ध करुन देण्याची मागणी अक्रम पटेल यांनी थेट शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्याकडे केली आहे.


बोडखा जिल्हा परिषद शाळा मुळातच जुनाट झाल्या आहेत. नवीन शाळा खोल्या वा


दुरुस्तीची येथे गरज आहे. पावसाळ्यात शाळेच्या वर्ग खोल्या गळतात खोल्याच्या आत पावसाचे पाणी येते. अशा अवस्थेत विद्यार्थी बसत आहेत. दरम्यान यामुळे शिक्षक विद्यार्थी यामुळे परेशान होत आहे. त्यामुळे नवीन शाळा उभारल्या तर ही समस्या कायमची दूर होईल. त्यामुळे या शाळेच्या खोल्यांसाठी तातडीने निधी दिला जावा अशा मागणीचे निवेदन त्यांना देण्यात आले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या